Trending

6/recent/ticker-posts

 पोल्ट्री व्यावसायाचे हजारो कोटीचे नुकसान केल्या प्रकरणी दोघांना अटक 

 पोल्ट्री व्यावसायाचे हजारो कोटीचे नुकसान केल्या प्रकरणी दोघांना अटक 
पुणे
चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. असे असताना चिकन, अंडी खाउ नका, तुम्हाला कोरोनाचा आजार होईल, असे व्हिडिओ,मेसेज तयार करुन ते सोशल मिडीयावर मागील काही दिवसांपासून व्हायरल केले जात होते. व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारीत करुन, राज्यातील पोल्ट्री व्यावसायाचे हजारो कोटीचे नुकसान केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  सायबर पोलिसांनी आंध्र परदेशातून एकाला तर,उत्तर प्रदेशातुन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.मोहम्मद अब्दुल सत्तार (रा.शहासेब, गोदावरी ईस्ट, काकिनाडा, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
या प्रकारामुळे राज्यासह देशातील पोल्ट्री उद्योजक,व्यावसायिकांना अंदाजे साडेसहाशे कोटी रुपयाचा फटका बसला आहे.याप्रकरणी औंध येथील राज्य पशुसंवर्धन विभागाने पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.  उत्तर प्रदेशात वाणिज्य शाखेत शिकनाऱ्या अल्पवयीन मुलाचा पोलिसांनी शोध घेतला. एका महिलेच्या मोबाइलचा वापर करुन त्याने युट्युबवर ही माहिती अपलोड केली होती. त्याने खोट्या मेलआयडीचा वापर करुन युट्युबवर चॅनेल सुरु केले होते. त्याने 60 पेक्षा अधिक व्हिडिओ युट्युबवर लोड केले आहेत. सुमारे महिनाभरापूर्वीच त्याला चिकन खाल्यामुळे करोनाची लागण  होते, असा व्हिडिओ प्राप्त झाला होता. या व्हिडिओची खातरजमा न करता त्याने तो युट्युबवर अपलोड केला होता.  तर दुसरा आरोपी मोहंम्मद सत्तार याचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान आहे. त्याने त्याच्या युट्युब 80 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याने व्हॉटसअपवर आलेला व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस नाईक अजित कुऱ्हे, पोलीस शिपाई हर्षल दुसाने, प्रसाद पोतदार यांनी ही कारवाई पोलीस केली.


Post a Comment

0 Comments