Top Post Ad

मुंबईचं झालं स्वच्छ हवामान 

मुंबईचं झालं स्वच्छ हवामान मुंबई
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची वाढती संख्या पाहता अंशत: बंद ठेवण्यात आला आहे. फक्त जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्युमुळे 24 तास सुरू असलेली देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही  कित्येक नागरिक घरात बंदिस्त झाले. मात्र तरीदेखील मुंबईकर मोकळा श्वास घेत आहेत. हाच कोरोना व्हायरसचा मुंबईला फायदा झाला असल्याचे मत काही पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईचं प्रदूषण लक्षणीयरित्या कमी झालं आहे. कोरोनाशी लढता लढता मुंबईकरांनी अप्रत्यक्षरित्या आणखी एका समस्येवर मात केली आहे. मुंबईकरांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका झालेली आहे आणि घरात बंदिस्त असूनही मुंबईकर मोकळ्या आणि शुद्ध हवेत श्वास घेत आहेत.
मुंबईमध्ये हे चित्र दिसतं आहे, कारण मुंबईतील नायट्रोजन ऑक्साईडचं (NOx) प्रमाण कमी झालं आहे. सफर (System of Air Quality Weather Forecasting and Research - SAFAR) या संस्थेने शनिवारी ही आकडेवारी जारी केली आहे. मार्च 2018 आणि मार्च 2019 शी तुलना करता मार्च 2020 च्या पहिल्या 3 आठवड्यात मुंबईतील नायट्रोजन ऑक्साईड (NOx) सरासरी 45 टक्क्यांनी घटलं आहे. सफरचे प्रोजेक्ट डायरेक्टर गुफ्रान बेग यांनी सांगितलं की, "मार्च 2018 आणि 2019 शी तुलना करता 2 ते 16 मार्च 2020 मध्ये NOx जवळपास 30 टक्के घटल्याचं दिसलं. तर मार्च 2020 सरासरी 45 टक्क्यांनी कमी झालं आहे" 
वांद्रे-कुर्ला संकुल मध्ये सर्वात जास्त 75 टक्के NOx कमी झालं आहे. या ठिकाणी सर्वात जास्त गाड्यांची वर्दळ असते. त्याचप्रमाण नेरूळ, नवी मुंबई आणि वरळीमध्यही NOx चं प्रमाण कमी झालं आहे. मात्र कुलाबा, मालाड, अंधेरी आणि माझगावमध्ये काहीच बदल दिसलेला नाही. बोरिवली आणि भांडुपमध्ये या कालावधीत प्रदूषण थोड्याफार प्रमाणात कमी झालं आहे. कोरोनाव्हायरसमुळे मुंबईत अंशत: लॉकडाऊन आहे. त्यामुळे रस्त्यांवर गाड्या कमी प्रमाणात आहेत. 
बेग म्हणाले, "गाड्यांमधून येणाऱ्या धुरात सर्वात जास्त NOx (जवळपास 60-80%) आणि PM2.5 (35-50%) असतं. जर रस्त्यावर गाड्यांच्या संख्येत बदल झाले तर त्याचा परिणाम NOx वरदेखील होतो.  शिवाय तापमानवाढ आणि हवेचा वेग याचाही PM2.5  वर परिणाम होतो. जो शनिवारी दिसून आला. या वर्षात 21 मार्चला मुंबईची हवा शुद्ध होती. मुंबईच्या हवेची गुणवत्ता (air quality index - AQI) 65 होती. जी समाधानाकारक आहे" नायट्रोजन ऑक्साइड हा विषारी वायू आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे श्वसनसंबंधी समस्या बळावतात. कोरोनाशी लढा देणाऱ्या मुंबईकरांनी अप्रत्यक्षरित्या प्रदूषणासोबतही दोनहात केलेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com