Trending

6/recent/ticker-posts

हक्काचं घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका: मुख्यमंत्री

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी घरांची सोडतमुंबई: 
गिरणी कामगारांचं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान मोठं आहे. त्यामुळे आज मी तुमच्यासमोर भाषण करणार नाही. तुमच्या कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे. तुमचे माझ्यावर उपकार आहेत. ते व्यक्त करण्यासाठीच इथे आलो आहे. घर मिळाल्यावर मला तुमच्या घरी चहा प्यायला बोलवा. आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 
 वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची सोडत काढण्यात आली. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर उपस्थित होते. 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिब्द आहे. घरे देताना एकाही गिरणी कामगाराला बेघर राहू देणार नाही,  तर गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुणालाही घरांपासून वंचित ठेवण्यात येणार नाही, असं सांगतानाच पुढील काळात गिरणी कामगारांप्रमाणए पोलीस आणि शासनातील चतुर्थश्रेणी कामगारांना १० टक्क्यांचं घरं देण्यात येईल, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.


Post a Comment

0 Comments