भीमा कोरेगाव प्रकरणी चार एप्रिलला शरद पवार साक्ष नोंदवणार
मुंबई
एक जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसा उसळली होती. या प्रकरणी स्थापण करण्यात आलेल्या भीमा कोरेगाव आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व्हा शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. चार एप्रिलला ही साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यासाठी शरद पवारांना आयोगाच साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे. शरद पवार हे स्वतःहून साक्ष नोंदवणार आहेत. चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी शरद पवार यांच्याकडे असलेल्या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी न्यायालयालाही माहिती दिली आहे. आता आयोगाचं चौकशीचं वेळापत्रक ठरलं असून शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्यात आलं आहे.
बोलावलं त्यांना जात जे सुनावणीला जात नाहीत. असं नाही आहे की त्यांना चार तारखेला हजर राहा. ॲडजर्न होणार नाही. कुठल्याच परिस्थितीत याची नोंद घ्या, अशा सूचना आहेत. कधी यायच त्याचीच नोटीस आयोगाने दिली आहे. कधी यायचं ते कळवण्यासाठी कामकाजाचा भाग म्हणून शरद पवार यांना नोटीस दिल्याचं समजते. शरद पवार यांनी स्वत: माध्यमांसमोर भीमा कारेगाव प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले होते. शरद पवार यांनी यापूर्वी चौकशी आयोगासमोर स्वतः एक प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. त्यानंतर त्यांना साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी करण्यात आली.
0 टिप्पण्या