Top Post Ad

चीनचे सर्वांत मोठे नाटक.......... मास्टर स्ट्रोक


चीनचे सर्वांत मोठे नाटक
 मास्टर स्ट्रोक
अंक पहिला
पडदा उघडतो : चीन आजारी पडतो, महारोगाच्या संकटात प्रवेश करतो आणि आपल्या स्वतःच्या व्यापाराला हानी करतो. पडदा बंद होतो.
अंक दुसरा
पडदा उघडतो : चिनी चलनाचे अवमूल्यन (चलन घसरते) केले जाते. पण चीन काही करतच नाही. पडदा बंद होतो.
अंक तिसरा
पडदा उघडतो : चीनमधे असलेल्या युरोप आणि अमेरिकेन कंपन्यांचा व्यापार कमी झाल्यामुळे त्यांचे शेअर्स त्यांच्या मूल्यांपेक्षा 40% पर्यंत खाली घसरतात.
अंक चौथा
पडदा उघडतो : आता जग महामारीच्या रोगाने (कोरोनामुळे) आजारी पडत आहे, अशा वेळी चीन त्या युरोप आणि अमेरिकेन कंपन्यांचे 30% शेअर्स अत्यंत कमी दराने विकत घेतो. पडदा बंद होतो.
अंक पाचवा
पडदा उघडतो : चीनने आता हा कोरोना रोग नियंत्रित केला आहे आणि त्या युरोप, अमेरिकेन कंपन्यांची चीनकडे मालकी आहे.  आणि तो निर्णय घेतो की, या कंपन्या चीनमधेच राहतील आणि त्यांतून 20,000 अब्ज डॉलर्सची कमाई निश्चित फायद्याची असेल. पडदा बंद होतो.
कसे वाटले हे नाटक?


आणि सहाव्या अंकात "चेकमेट"


आश्चर्य आहे ना?...  परंतु सत्य आहे
काल आणि आजच्या दरम्यान दोन व्हिडिओ आले, ज्याने मला संशयास्पद गोष्टीची खात्री पटली, परंतु त्याला माझ्याकडे पहिले कोणताही आधार नव्हता. ती फक्त माझी जाणीव होती. पण आता मला खात्री झाली आहे की, कोरोना व्हायरस हेतु पुरस्सर स्वत:च चिनी लोकांनी तयार केला होता.
सर्व प्रथम ते ह्या महामारीला आधीच पूर्ण तयार झाले होते. तीन आठवड्यांनंतर, त्यांचा रोल सुरु झाला. 14 दिवस आणि 12,000 खाटांची 12 रुग्णालये आधीच तयार आणि त्यांनी खरोखरच दोन आठवड्यांत ती रुग्णालये तयार केली आहेत.
अप्रतिम आहे ना...? 
काल त्यांनी जाहीर केले की, त्यांनी हा साथीचा रोग थांबविला आहे. त्याबद्दल ते आनंद साजरा करत असलेल्या व्हिडिओंमध्ये घोषित करतात की, त्यांच्याकडे अगदी लस (vaccine) देखील आहे. एखाद्या रोगाचे मुळातले ज्ञान नसताना ते इतक्या लवकर लसी कसे तयार करु शकले? बरं... जर आपणच एखाद्या रोगाचे मूळ द्योतक असाल, तर त्याची लस बनवणे मुळीच कठीण नाही.
आणि... आज मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला आहे ज्यामध्ये Den Xiao Ping यांनी पश्चिमेकडे अर्धा आर्थिक साठा कसा दिला हे स्पष्ट करते. कोरोना व्हायरसमुळे, चीनमधील पाश्चात्य कंपन्यांच्या हालचाली नाटकीय रित्या घसरल्या. जेव्हा ते आणखी खाली घसरतील तेव्हा त्यांना चीनकडून पूर्ण आर्थिक साठा विकत घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता या कंपन्या, ज्या अमेरिकेने आणि युरोपने चीनमधे तयार केलेल्या आहेत, त्यांचे सर्व तंत्रज्ञान अमेरिकेच्या हाती अशा देवाणघेवाणीने तयार केल्या आहेत, त्यांची भांडवल सूत्रे चीनच्या ताब्यात असतील. पण आता तेथील कार्यप्रणाली चीनच्या सर्व तांत्रिक क्षमतांनी वाढत आहे आणि चीनच्या इच्छेनुसार वस्तूंच्या किंमती ठरविण्यास ह्या कंपन्या सक्षम असतील. त्या वस्तू त्याच किंमतीत पाश्चात्य व अन्य देशात विकल्या जातील.
मग कसा काय वाटला चीनचा हा masterstroke?
हे काहीही योगायोगाने घडलेले नाही. काही वृद्ध माणसे मरण पावली अशी चिंता चीनने कोणाला दाखवली? ते वृद्ध ज्यांची कमी वयाची पेंशन, परंतु त्यातील लूट खूप मोठी होती. त्यात सध्या पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या पूर्ण पराभूत झाले आहे, संकटात आहेत, महामारीच्या आजाराने स्तब्ध आहेत आणि काय करावे हे त्यांना आता कळत नाही आहे.
कुशलपणे खेळलेले नाटक, एक राक्षसी कृत्य... नक्कीच...
यात भर अशी की, चीन आता अमेरिकेच्या तिजोरीचे सर्वात मोठे मालक झाले आहेत. जपानला मागे टाकत 1.18 ट्रिलियन डॉलर्स त्यांच्या मालकीचे आहेत.
संभाव्यता आणि साम्यता
रशिया आणि उत्तर कोरियामध्ये कोविड -19 (कोरोना) चे प्रमाण कमी किंवा शून्य कसे आहे?... कारण ते चीनचे कट्टर सहयोगी आहेत.
दुसरीकडे यूएसए / दक्षिण कोरिया / युनायटेड किंगडम / फ्रान्स / इटली / स्पेन आणि आशियाला ह्या महारोगाचा जोरदार फटका बसला आहे.
Wuhan शहर अचानक ह्या प्राणघातक विषाणूपासून मुक्त कसा काय होते?
चीनचे म्हणणे आहे की, त्यांनी घेतलेले प्रारंभिक उपाय फारच कठोर होते आणि wuhan शहरातून ह्या आजाराला इतर भागात पसरवण्यासाठी बंदिस्त केले होते.
पण मग बीजिंगला फटका कां बसला नाही? फक्त wuhan च का?... यावर विचार करणे मनोरंजक आहे ना... बरोबर?
बरं मजेची गोष्ट म्हणजे... Wuhan आता व्यापार व्यवसायासाठी खुलेदेखील झाले आहे.
कोविड -19 (कोरोना) हा आजार अमेरिकेने चीनला व्यापार युद्धामध्ये हातोहात धुतल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने अमेरिकेला दिलेली चपराक आहे.
आता अमेरिका आणि वरील सर्व देश आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. लवकरच चीनने आखल्याप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडेल. कारण चीनला हे माहित आहे की, अमेरिकेला सैन्याने पराभूत करू शकत नाही कारण सध्या अमेरिका हा सैन्य दृष्टीने जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. (ही तिसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती)
मग अशा व्हायरसचा वापर करा, जी इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला पांगळा करण्यासाठी आणि देश व त्याची संरक्षण क्षमता लुप्त करण्यासाठी कामी येईल.
मला खात्री आहे की, Trump ला पळवून लावण्यासाठी नॅन्सी पेलोसीचा यात सहभाग असणार... !
अलीकडेच अमेरिका अध्यक्ष Trump नेहमीच सांगत आले होते की, ग्रेट अमेरिकन अर्थव्यवस्था सर्वच आघाड्यांवर कशी सुधारत आहे आणि सर्व नोकऱ्या अमेरिकेत पुन्हा आल्या आहेत.
आणि... अमेरिकेला ग्रेट बनविण्याच्या त्यांच्या ह्या दृष्टीकोनाचा नाश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आर्थिक मंदी तयार करणे.
Trump ला निवडणूक माध्यमातून खाली आणण्यात नॅन्सी पेलोसी असमर्थ होती... म्हणून व्हायरस माध्यमातून Trump चा नाश करण्यासाठी तीसुद्धा चीनबरोबर काम करण्यास तयार झाली.
Wuhan चा साथीचा रोग हे केवळ एक प्रदर्शन होते.
हा आजार अगदी साथीच्या शिखरावर असताना, चीनचे अध्यक्ष Xi Jinping... त्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्या भागात भेट देण्यासाठी फक्त एक साधा आरएम-1 फेसमास्क घालून होते.
एक देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी डोके ते पायापर्यंत झाकलेले असायला हवे होते... परंतु तसे झाले नाही.
कारण त्यांना विषाणूपासून होणाऱ्या संसर्गापासून प्रतिकार करण्यासाठी आधीपासूनच इंजेक्शन दिले गेले होते .... याचा अर्थ असा की, व्हायरस निघण्यापूर्वीच त्याची औषधी तयार होती.
तीव्र आर्थिक महामंदीच्या काठावर असलेल्या सर्व देशांकडून शेअर्स आणि भांडवल खरेदी करून जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा हा चीनचा दृष्टिकोन आहे... नंतर आपोआपच चीन त्यांच्या वैद्यकीय संशोधकांनी विषाणू नष्ट करण्यासाठी औषधी मिळवली असल्याचे जाहीर करेल.
आता चीन सर्व पाश्चात्य संग्रहाचा आर्थिक साठा आपल्या हाती घेईल आणि उर्वरित सर्व देश लवकरच त्यांच्या नवीन मास्टरचे गुलाम होतील... तो मास्टर म्हणजेच चीन!


 


-------------------------------


 


      प्राण्यांनी जन्माला घातलेला,स्वतःचं अन्न स्वतः बनवू  शकत नसल्यामुळे,माणसाच्या शरीरात येऊन माणसाच्या  पेशींमधली उर्जा वापरून जिवंत राहणार्‍या, डोळ्याला दिसतही नाही इतका छोटासा, कोरोना विषाणू- वायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर त्यांची लागण अमेरिका फ्रान्स, आॅस्ट्रेलिया, मकाऊ,  व्हिएतनाम कॅनडा,तैवान,जपान,   सिंगापूर,नेपाळ,भारतसह अनेक आशियाई देशात आढळून आली आहे. फ्लू किंवा इबोला सारखीच लागण झालेल्या कोरोना वायरसमुळे ताप,सर्दी, खोकला,अशी प्राथमिक लक्षणं दिसतात.हळूहळू श्वसनसंस्थेचे विकार किंवा न्युमोनिया सारखा आजार होऊन माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.
       कोरोनाचा प्रसार चीनमधील दळणवळणाचं महत्वाचं ठिकाण म्हणून ओळखण्यात येणार्‍या वुहान शहरापासून झाला. त्यामुळे वस्तूंची मागणी असली तरी त्या पुरवण्यासाठी चीनमध्ये दळणवळणाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहे.अशा परिस्थितीत एकतर वस्तू उपलब्धच होत नाहीत आणि झाल्या तरी अत्यंत महागात विकल्या जातात.या घटनेमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेलाही कोरोनाची लागण झालीय.२००३मध्येही चीनमधूनच सार्स नावाच्या रोगाचा प्रसार झाला.तेव्हाही चीनच्या अर्थव्यवस्थेला  सार्सची लागण झाली होती. त्यावेळी सपाटून मार खाल्लेल्या चीनचा जीडीपी ११ वरून सरळ २.५ टक्क्यांवर आपटला होता.यावेळीही चीनची अर्थव्यवस्था अधिकच खालावली असल्याचा धोका अर्थतज्ञांकडून व्यक्त केला जातोय. वेगाने प्रसार झालेल्या या विषाणूवर प्रतिबंधात्मक औषधंही सापडत नाहीय. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना तथा वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे.फक्त आरोग्यावरच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रावर या विषाणूचे परिणाम आता दिसू लागलेत.
        चिनी अर्थव्यवस्थेवर पहिला वार करणार्‍या कोरोनाने दुसरा वार जागतिक अर्थव्यवस्थेवर केलाय.अनेक गोष्टींसाठी,वस्तूंसाठी चीन ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती आल्याने जागतिक बाजारपेठांनी आपला मोठा ग्राहक गमावला आहे. गुंतवणूकदार रिस्क घेण्याऐवजी सेफ गेम खेळताना दिसत असून सुरक्षित ठिकाणीच पैसा गुंतवण्याला प्राधान्य देत आहेत.हा वायरस आशियाई देशांतही पसरल्यामुळे धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी आशियाई देशातील गुंतवणूक काढून घेतली आहे.त्यामुळे आशियाई शेअर बाजार गडगडला आहे.चीन हा तेलाचाही मोठा ग्राहक आहे.दरवर्षी तेलाच्या मागणीत ५.५ टक्क्यांनी वाढ होते पण चीनमधील संचारबंदीमुळे तेलाची मागणी कमी झाली आहे.तेलाचे भाव अजून वाढू शकतात अशी भीती वर्तविण्यात येत आहे.२०१९ मध्ये जपानला भेट देणार्‍या एकूण प्रवाशांपैकी ३० टक्के प्रवासी चीनमधून आले होते.कोरोना वायरसमुळे ही संख्या कमी झाली झाल्यामुळे जपानच्या पर्यटनावर परिणाम झाला आहे.न्यू इअरच्या निमित्ताने जानेवारी महिन्यात हजारो पर्यटक एका देशातून दुसर्‍या देशात प्रवास करत असतात. कोरोनामुळे हा प्रवास ठप्प झाला आहे. जपानच्या निर्यातीवर व काॅर्पोरेट क्षेत्रावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे.जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या जीडीपीतले चढ उतार जागतिक पातळीवर खूप मोठे परिणाम करतात. आधीच भारतात मंदी असल्यामुळे जागतिक अर्थव्यस्थेतही मंदीचं सावट होतं.त्यात चीनमधून निर्माण झालेलं हे नवं कोडं सर्वांच्याच डोकेदुखीचं कारण ठरतंय.
       आर्थिक आणि राजकीय चढाओढ  सुरू असलेल्या अमेरिका आणि चीन या दोघांमधल्या ट्रेड वाॅरमुळे जगभरातील गुंतवणूकदारांना काळजीत टाकलं होतं.पण १५ जानेवारीला या दोन देशानी द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर सह्या करून व्यापार युद्ध संपवण्याच्या दिशेने पावलं टाकली होती.या कराराने आर्थिक क्षेत्रातल्या अनेकांना दिलासा मिळाला.आता जगाचा आर्थिक वाढीचा दर (जीडीपी)वाढेल अशी चिन्हं दिसत असतानाच चीनमधील धुमाकूळ घालणार्‍या या कोरोना वायरसमुळे अख्ख्या जगाची आर्थिक घडी पुन्हा एकदा फिस्कटण्याची चिन्हं दिसत आहेत.
         चीनमध्ये २५ जानेवारीच्या आसपास 'ल्यूनार न्यू इअर 'तथा नवीन वर्ष सुरू होतं. त्यामुळे अनेक आशियाई देशात सुट्ट्याही दिल्या जातात.सुट्ट्यांच्या निमित्ताने यंदाही चीनमधील अनेक लोक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करत होते.त्यामुळेच कोरोना वायरस देशात व जगभरात जोराने पसरला आहे.कोरानाचा पहिला वार चीनच्या अर्थव्यवस्थेवर झाला.न्यू इअरच्या सुट्ट्या नंतर आठवड्याभराची सुट्टी दिल्यामुळे चीन मधील नवं उत्पादन ठप्प झालं. एक्सपोर्ट हब म्हणून ओळखण्यात येणार्‍या चीनची निर्यातही थांबली. त्यामुळे जगभरातील मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालताना अनेक देशांना नाकेनाऊ होऊन बसलं. कोरोना संसर्ग रोग असल्यामुळे लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळले,परिणामी चीनच्या मनोरंजन क्षेत्रावरही विपरित परिणाम झाला आहे.चीन मधील कोरोना बाधित अनेक रूग्ण एकाचवेळी हाॅस्पिटलमध्ये भरती झाल्यामुळे त्याचा विमा कंपन्यांना तोटा सोसावा लागतोय.अर्थविषयक पेपर लाइव मिंटच्या बातमीनुसार या कोरोना विषाणूमुळे शेअर बाजारासोबतच तेलाच्या किंमतीत आणि भारतीय रूपयात घसरण झाली असून भारतात सेन्सेक्स १.१ टक्क्याने घसरला आहे.तसचं डाॅलरच्या तुलनेत भारतीय  रूपयामध्ये झालेली घसरत सगळ्यात मोठी घसरण असल्याचे सदर बातमीत स्पष्ट म्हटलं आहे.
        कोरोना वायरसमुळे हाॅस्पिटलमध्ये वापरण्यासाठी रबरी हॅण्डग्लोव्ज आणि चेहर्‍यावरचे मास्क यांचीही मागणी वाढलीय. कोरोनावर अजून कोणतंही प्रतिबंधात्मक औषध सापडलेलं नाही. पण सर्दी,ताप,अशा लक्षणांवर मात करणारी  व बाजारांत उपलब्ध असणारी छोटी औषधं  प्राथमिक उपचार म्हणून सध्या रूग्णांला दिली जात आहेत.पण आरोग्य आणीबाणी पाहता लवकरच या आजारावर प्रतिबंधात्मक औषध तयार केलं जाईल. एकंदरीत पाहता,कोरोना वायरसमुळे,आरोग्य क्षेत्र,आणि औषधं तयार करणार्‍या कंपन्या आणि त्यात आर्थिक गुंतवणूक करणार्‍यांचा मोठा फायदा होणार आहे. पत्रकार रेणुका कल्पना यांनी, चीन व नंतर जगभर थैमान घालणार्‍या कोरोना वायरसमुळे, चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार्‍या  परिणामावर, लेखात केलेले हे अभ्यासपूर्ण भाष्य खरोखरच उल्लेखनीय,व सुज्ञ वाचकांना, विदारक वास्तवाची जाणीव करून देणारे ठरते असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही हे मात्र तितकेच खरे!


—————पत्रकार अरूण दीक्षित.खोपोली.  २५/३/२०२०               (९४२२६९४६६६/८१६०१०५९४०)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com