Trending

6/recent/ticker-posts

नागरिकांनी दैनंदिन कामांसाठी इ-मेलद्वारे संपर्क साधण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन

नागरिकांनी दैनंदिन कामांसाठी इ-मेलद्वारे संपर्क साधण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहनठाणे
जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणू रोगाचा प्रसार टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका भवनात होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याच्या उद्देशाने नागरिकांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने जाहिर करण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाईटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. प्राप्त ईमेलवरील रितसर कार्यवाही करुन सात दिवसांत नागरिकांना ईमेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. अत्यंत तांतडीचे टपाल, संदेश हे ईमेलद्वारे पाठविण्यात यावेत तसेच ठाणे महानगरपालिका कार्यालयात दैनंदिन टपाल व इतर महत्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक विभागाच्यावतीने प्रवेशद्वारावरच टपाल स्विकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने महापालिका भवनात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी मुख्यालय तसेच प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना पुढील आदेश होईपर्यंत अत्यावश्यक कामकाज वगळता प्रवेश मर्यादित करण्यात आले आहेत.  नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाईटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.  महानगरपालिकेचा कर व अन्य देय रक्कमांसाठी नागरिकांना डिजीटल ऑनलाईन सेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑफलाईन कर व तत्सम भरणा करण्यासाठी मर्यादित स्वरुपात महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये प्रवेश देण्याची दक्षता सुरक्षा विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
 सर्व विभागप्रमुख /अधिकारी यांच्याकडे  त्यांच्या कार्यालयात होणाऱ्या बैठका तातडीच्या असल्यास तरच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येणार आहेत.  सदर बैठकांसाठी महापालिकेच्या बाहेरील अधिकारी, कर्मचारी  अथवा खाजगी व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात येणार नाही. तसेच महानगरपालिकेत कार्यरत कर्मचारी यांच्या दैनंदिन हजेरीसाठी वापरण्यात येणारी बायोमेट्रीक मशिनची हजेरी प्रक्रिया बंद करण्यात येत असून प्रत्येक विभागामध्ये हजेरीपट ठेवून त्याद्वारे हजेरीची नोंद ठेवण्यात येणार आहे.             


Post a Comment

0 Comments