Top Post Ad

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही  - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही  - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
 
ठाणे
ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही तसेच एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही.  या विषाणूचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पुरेशी खबरदारी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर  आयोजन करणे टाळा. घाबरू नका पण सतर्क रहा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.   
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील मेडिकल असोसिअशनचे पदाधिकारी यांची  संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भात नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही  आणि उपाययोजनांबाबतचा आढावा घेतला. 
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन  सज्ज असून जिल्हा रुग्णालये, जिल्हापरिषद आरोग्य विभाग, तसेच महानगर पालिकांच्या  आरोग्य विभागांच्या वतीने सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये  १० खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. संशयित रुग्ण आढळ्यास त्यावर करावयाच्या उपचारांबाबत तसेच उपाययोजनाबाबत सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर व संबधितांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू आहे.
 जिल्ह्यात सर्व प्रकारच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हि औषधे रास्त दरात उपलब्ध होतील याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वाजवी पेक्षा जास्त दराने आकारणी आढळून आल्यास त्या व्यावसायिकाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरीकांनी विनाकारण मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही. मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, विशिष्ट अंतरावरुनच इतरांशी संवाद साधावा, खोकताना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. तसेच समारंभ, जत्रा, यात्रा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्याचे टाळावे असे आवाहन  नार्वेकर यांनी  केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com