Trending

6/recent/ticker-posts

नायर रुग्णालयातील स्टाफला आमदार संजय केळकर यांनी करुन दिली बसेसची व्यवस्था

नायर रुग्णालयातील स्टाफला आमदार संजय केळकर यांनी करुन दिली बसेसची व्यवस्थाठाणे
नायर हॉस्पिटलमधील स्टाफ नर्सेस, डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी ड्युटीवर जाण्याकरिता बेस्ट बसेस तसेच एस टी ची व्यवस्था करून दिल्याबद्दल  आमदार संजय केळकर यांचे स्टाफने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. सध्य परिस्थितीत सर्वांना ड्युटीवर येणे आवश्यक आहे,  काही स्टाफ हा पनवेल, विरार, वसई, बदलापूर येथून येत आहे आणि येताना त्यांना दोन ते तीन गाड्या बदलून नायर हॉस्पिटलमध्ये दोन तीन तासाच्या प्रवासानंतर यावे लागते. याकरिता  ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना थेट नायर हॉस्पिटल बसेस सेवा मिळावी अशी विनंती केली असता त्यांनी तत्काळ मा. आरोग्य मंत्री आणि आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क करून ठाणे (तिन हात नाका) - नायर हॉस्पिटल,  पनवेल - नायर हॉस्पिटल, बदलापूर - नायर हॉस्पिटल आणि विरार - नायर हॉस्पिटल अशी थेट बस सेवा सुरू करून दिल्याने शेकडो स्टाफ ला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे  सौ. सुजाता विधाते आणि सर्व स्टाफ नसेंस, डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.


--------------


 


एक नर्स म्हणुन मी कालचा प्रवास तुमच्या समोर मांडू इच्छिते..!!
दिनांक २३ मार्च २०२०..!!
सकाळी 5.30 ला घरातून निघाले, माझा मुलगा मला सोडायला कल्याण स्टेशन वर आला. ट्रेन बंद होत्या. बसने जायचा विचार करत होते तेव्हाच पंजाब मेल येत आहे अशी अन्नोउन्समेंट झाली म्हणून स्टेशनवर गेले,तिथे आधीच माझ्या 3 मैत्रिणी,शारदा,सपना,आणि शीतल माझी वाट बघत होत्या.आम्ही 5.45ला त्या मेल मध्ये बसलो.तिकीट तपासनीस ना विनंती केली की भायखळा ला 2मिनिटांसाठी गाडी थांबवा...पण गाडी सुरू झाली 7 वाजता.आमच्यासोबत आमच्या seniors पण होत्या दुसऱ्या बोगी मध्ये.
भायखळा ला गाडी स्लो झाली पण थांबली नाही म्हणून काही gents लोकांनी चैन ओढून गाडी थांबवली पण तोपर्यंत गाडी स्टेशन पासून बरीच पुढे गेली होती,पुन्ह आम्ही ट्रॅक मधून चालत स्टेशन गाठलं आणि 9 वाजता ड्युटी वर पोहोचलो.
इथंच आमचा प्रवास थांबला नाही , ड्युटी वरून पुन्हा 2.30 pm ला निघालो, मुंबई सेन्ट्रल बस डेपोत चालत गेलो तिथून बस ने दादर ला आलो, दादर हुन भिवंडी बस मिळाली त्याने कल्याण फाटा आणि तिथून कल्याण स्टेशन आणि मग घरी संध्याकाळी6pm ला पोचले.हे संगण्यामागचा उद्देश हा की
शासनाने १४४ कलम लागू करून देखील सुशिक्षित-अशिक्षित लोक आपल्या दुचाकी - चारचाकी ने फिरत होती..!!
या कर्तबगारांना कुठे जाऊन झेंडे रोवयचे होते कुणास ठाऊक
.
आमच्या सगळ्यांच्या मनात राहून राहून हा विचार येतो,
का आणि कुणासाठी आपण ही जीवाची बाजी लढवतोय , त्या बेजबाबदार प्रजेसाठी..!!
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वेळोवेळी योग्य ते निर्णय घेण्यास मागे सरत नसून..!!
सरकार वारंवार सांगतंय घरातून बाहेर पडू नका..!!
आरोग्य सेवक, पोलीस , आणि अत्यावश्यक गटात काम करण्यारांना सहकार्य करा पण मुळात तुमचं कसं झालंय तुम्हाला सरकारने आयता घास दिलाय..!!
त्याची तरी जाण ठेवा..!!
आमच्या घरच्यांना नसेल का ओ आमची काळजी,आम्ही पण आमच्या लहान मुलांना, घरी सोडून येतो... तरीही स्वतःला या संकटात ढकलू पाहतोय..!!
आता तर कस्तुरबा नंतर kem आणि नायर हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आलेच तर त्या हॉस्पिटल मध्ये तेवढी व्यवस्था नाही, ..!! तिथे आम्ही तुम्हाला काय स्वतःला ही नाही सावरू शकणार..!!
तुमच्या गैरवर्तणुकी मुळे घर ते रुग्णालय हा प्रवास ही तुम्ही आमचा विस्कळीत करून ठेवलाय..!! आज तुम्ही सगळे घरी राहिला असता तर ट्रेन चालू राहिल्या असत्या,
लॉकडाउन होऊनही या प्रजेसाठी आम्ही बाहेर पडणार होतो..!!
पण आता विचार पडतोय..!!
कुटुंबाचा त्याग करून खरंच या प्रजेसाठी आम्ही आमचा जीव धोक्यात घालावा का..??
.
.सौ उषा अरगुलकर
स्टाफ नर्स
नायर हॉस्पिटल.

 — with Usha Naik Argulkar.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या