मुंबईच्या सेवन हिल्स रुग्णालयातच कोरोना संक्रमित रुग्णांसाठी 100 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल 

मुंबईच्या सेवन हिल्स रुग्णालयातच कोरोना संक्रमित रुग्णांसाठी 100 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल मुंबई
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्याची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मुंबई महानगर पालिका आणि रिलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संक्रमित रुग्णांसाठी 100 बेडचे हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल फक्त दोन आठवड्यांमध्येच तयार करण्यात आले.  कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीचे हे देशातील पहिले हॉस्पीटल आहे. या हॉस्पिटलचे नाव व्हायरसच्या नावावर म्हणजेच कोव्हिड-19 ठेवले आहे. मुंबई महानगर पालिका आणि एचएन रिलायंस फाउंडेशनने या हॉस्पीटलला मुंबईच्या सेवन हिल्स हॉस्पिटलमध्येच तयार केले आहे. सध्या या हॉस्पीटलमध्ये फक्त मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांच ठेवले जातील. या हॉस्पिटलमध्ये एक निगेटिव्ह प्रेशर रूम सामील आहे, जे क्रॉस कंटेमीनेशन म्हणजेच, संक्रमणाला पसरण्यापासून रोखते. सर्व बेड, बायो मेडिकल उपकरण जसे वेंटिलेटर,पेसमेकर, डायलिसिस मशीन्सनी युक्त आहेत. 


परदेशातून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे रुग्णालय सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशनने विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचीही तयारी दाखवली आहे. यामुळे विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने मिळतील आणि रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातील, असं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.   या रुग्णालयात क्चारंटाईन सुविधा, कोरोना चाचणीच्या किट्सची सुविधा असून, रिलायन्सचा प्रतिदिन 10 लाख मास्कही तयार करण्याचाही मानस आहे. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय मदत, जिओ प्लॅटफॉर्मचा वापर करून आरोग्य सेवा आणि सर्व आपत्कालीन सेवा वाहनांना मोफत इंधन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे. रिलायन्सनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीला पाच कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad