Top Post Ad

मिसाइल नव्हे तर मायक्रोब्ज तब्बल 1 कोटी लोकांच्या मृत्यूचं कारण ठरू शकेल', - बिल गेट्स

मिसाइल नव्हे तर मायक्रोब्ज तब्बल 1 कोटी लोकांच्या मृत्यूचं कारण ठरू शकेल', - बिल गेट्स



नवी दिल्ली, 
'काही दशकात मिसाइल नव्हे तर मायक्रोब्ज तब्बल 1 कोटी लोकांच्या मृत्यूचं कारण ठरू शकेल', असं बिल गेट्स (Bill gates) 2015 सालीच म्हणाले होते. महाभयंकर कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभरात हजारो बळी घेतलेत, लाखोंना विळखा घातला. अद्यापही या व्हायरसवर उपचार सापडलेला नाही आणि सध्या जी परिस्थिती आहे, त्याची भविष्यवाणी बिल गेट्स (Bill gates) यांनी 5 वर्षांपूर्वीच केली होती. जगभर कोरोनाव्हायरसच्या उद्रेकानंतर त्यांचा ( https://www.youtube.com/watch?time_continue=165&v=6Af6b_wyiwI&feature=emb_logo )  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
2014 साली दक्षिण आफ्रिकेत एबोलाचा असा उद्रेक झाला होता. त्यानंतर 2015 साली टेड टॉकमध्ये (Ted talk) बिल गेट्स यांनी त्यावर चर्चा केली, त्याचवेळी त्यांनी भविष्यातील व्हायरसच्या धोक्याबाबत सावध केलं होतं.
बिल गेट्स म्हणाले होते, "पुढील काही दशकात युद्ध नव्हे तर असा व्हायरस 10 दशलक्ष लोकांचा जीव घेऊ शकेल, मिसाईल नाही तर मायक्रोब्स कोट्यवधी लोकांचा जीव घेईल. कारण आपण अशा महामारीवर मात करण्यासाठी तयारी केलेली नाही" बिल गेट्स यांनी सांगितल्याप्रमाणेच कोरोनाव्हायरस कोणत्याही युद्धापेक्षा जास्त लोकांचा जीव घेतो आहे. अगदी बलाढ्य देशांचीही कंबर त्याने मोडली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com