Top Post Ad

आपल्या घरी येणारे वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे, 1 एप्रिल पासून वृत्तपत्रांचे होणार वितरण


आपल्या घरी येणारे वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे - जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) नवी दिल्ली -
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने संपूर्ण देशभरात आता २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या घरातच बंदिस्त रहावे लागणार आहे. फावला वेळ घालवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर टीव्ही आणि वृत्तपत्रे हे दोन पर्याय आहेत. अशातच वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा सहजपणे संसर्ग होतो अशी अफवा पसरली आहे. परंतु हा दावा अगदी बिनबुडाचा, खोटा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा (डब्ल्यूएचओ) ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार वृत्तपत्रांद्वारे संसर्ग होण्याची शक्यताच फार धूसर आहे, किंबहुना वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. वृत्तपत्रे वेगवेगळ्या तापमान आणि प्रक्रियेमधून जातात. त्यामुळे त्याची लागण अथवा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे. अमेरिकेतील एका वैद्यकीय संस्थेनुसार वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अगदी नसल्यासारखेच आहे. वृत्तपत्रासारख्या पृष्ठभागावर कोरोना विषाणू जिवंत राहणे सोपे नाही.
वृत्तपत्रांचे सामूहिक वाचन टाळा असा सल्ला अवश्य देण्यात आला आहे. लायब्ररी अथवा सोसायटीमध्ये अनेक लोकांकडून वाचली जाणारी वृत्तपत्रे शक्यतो हाताळू नये, किंवा हाताळल्यास हात अवश्य धुऊन घ्यावेत. परंतु आपल्या घरी येणारे वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. वृत्तपत्राच्या छपाईवेळीही कर्मचारी पूर्णत: खबरदारी घेत आहेत. वृत्तपत्रांना सॅनिटाइज करूनच घरपोच वाटण्यासाठी पाठवले जात आहे. आजकाल अत्याधुनिक मशीनद्वारे वृत्तपत्रांची छपाई केली जाते. ही सर्व यंत्रे स्वयंचलित आहेत. तसेच डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, सध्या लोकही वारंवार आपले हात धूत आहेत. सुमारे २० सेकंद हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांनी आपल्या घरीच राहावे, असाही सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.


 


 


1 एप्रिल पासून वृत्तपत्रांचे होणार वितरण


मुंबई
 केंद्र व राज्य सरकारने १४ एप्रिल पर्यंत लागू केलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर काल २५ मार्च रोजी उद्योगमंत्री , सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत विक्रेते प्रतिनिधी व वृत्तपत्र प्रकाशकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली . केंद्र व राज्य सरकारने सुरू ठेवावयाच्या सेवा वर्गात प्रसार माध्यमाचा समावेश केल्यामुळे , महाराष्ट्रातील वृत्तपत्रे  1 एप्रिल 2020 पासून प्रसिध्द व वितरीत करण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे.
      या बैठकीत निश्चित ठरवलेली कामे
वृत्तपत्रांचे 1 एप्रिल 2020 पासून प्रकाशन व वितरण पुन्हा सुरू करण्यात येईल,  प्रतींची मागणी विक्रेते आधीच्या दिवशी नोंदवतील, शिल्लक प्रती कंपनी कोणतीही सबब न सांगता परत घेतील, १४ एप्रिल पर्यंत बिल भरण्यास सवलत देणेबाबत कंपन्या सहानुभूतीने विचार करतील, डेपोवर गर्दी केली जाणार नाही अंक वेळेवर पोहोचविले जातील . ( पहाटे ३ ते ७ ) , वृत्तपत्रे निर्जंतुक केली जातील. विक्रेत्यांना हँड सॅनिटायझर्स , मास्क कंपन्या पुरवतील, विक्रेते व वितरण सहाय्यकांच्या रूग्णालय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल . ( फक्त कोरोना ) ,सोसायट्या / संस्था / वाचकांना वृत्तपत्रे स्वीकारण्याची विनंती कंपन्या करतील, विक्रेते व वितरण सहाय्यकांना कंपन्या ओळखपत्रे उपलब्ध करून येतील . ( नावे विक्रेते देतील . ) हे इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com