Top Post Ad

1 एप्रिलपासून बँकांचे विलीनीकरण होणार

 



तरीही 1 एप्रिलपासून बँकांचे विलीनीकरण होणार ?


नवी दिल्ली
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असली तरीही 10 महत्त्वाच्या बँकाचे विलीनीकरण 1 एप्रिलपासून होणार आहे.  4 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठ्या बँकांच्या विलीनीकरण करण्यास मंजूरी मिळाली होती. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक विलीन होईल. यानंतर तयार होणारी बँक देशातील दुसरी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 17 लाख कोटींचा असेल. अर्थ मंत्रालयाकडून 30 ऑगस्ट 2019 ला विलीनीकरणाबतची घोषणा करण्यात आली होती. यासंदर्भात सरकारकडून नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात येईल. त्यानंतर देशामध्ये 4 मोठ्या बँका अस्तित्वात येतील. 1 एप्रिल 2020 पासून या बँकांचा कारभार सुरू होण्याची शक्यता आहे.
बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे ढकलण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे का, असा प्रश्न विचारला असता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले की, ‘सध्या असा कोणताही विचार नाही आहे.’ देबाशीश पांडा यांनी माहिती दिली की विलीनीकरणाची प्रक्रिया योग्य रुळावर आहे. बँकिंग क्षेत्र कोरोनाशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन (AIBOC)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बुधवारी विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मीडिया अहवालानुसार विलीनीकरण झाल्यानंतर या बँकांची नावं देखील बदलण्यात येतील. दरम्यान सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विलीनीकरण करण्याची घोषणा करताना असं सांगितलं होतं की, हे विलीनीकरण झाल्यानंतर देशामध्ये सरकारी बँकांची संख्या 12 वर येईल. 2017 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 होती. याआधी देना बँक आणि विजया बँक, बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com