Top Post Ad

शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी

शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी
-  जिल्हाधिकारी नार्वेकर



ठाणे 
प्रधानमंत्री किसान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री राजेश जे. नार्वेकर यांनी जिल्हा यंत्रणांना दिले.  
जिल्‍हयामध्‍ये कोणत्‍याही वित्‍तीय संस्‍था तसेच बँकाकडून  पिक कर्ज न घेतलेले 79 हजार 536 पीएम किसान योजनेचे लाभार्थी  शेतकरी   आहेत.  या शेतक-यांना बँकिंग क्षेत्रापासून  पिककर्ज  उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी  विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी  राजेश जे. नार्वेकर यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी जे एन भारती, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक किशोर पडघान तसेच कृषी अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून  आढावा घेतला. त्यावेळी श्री नार्वेकर यांनी  संबंधितांना विशेष मोहिमेचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.  तसेच जिल्ह्यातील सर्व बँक शाखांना या बाबत कळविण्या बरोबरच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही अशा पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी  दिले. शेतक-यांना  सुटसुटित रित्‍या अर्ज करता यावा यासाठी  आयबीए संस्‍थेकडून  एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅकांना उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. लाभर्थी शेतक-यांनी  या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषणपत्रसह  ज्या बॅकेतून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे, तेथे संपर्क साधावा.
कोणत्‍याही बँक अथवा वित्‍तीय संस्‍था  येथे पिक कर्ज नसणा-या पीएम किसान  लाभार्थी  शेतक-यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च हा बँकाकडून माफ करण्‍यात येणार आहे.  परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह  प्राप्‍त झाल्यापासून 15 दिवसामध्‍ये  शेतक-यांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजने अंतर्गत  पिक कर्ज उपलबध करुन देण्यात येणार आहे.
सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पावतळीवर यासाठी विशेष मोहिम राबवून आपल्‍या कार्यक्षेत्रातील  बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशा सूचना नार्वेकर यांनी दिल्या आहेत. ज्‍या  पीएम किसान अंतर्गत लाभार्थी  शेतक-यांनी अद्याप कोणत्‍याही  वित्‍तीय संस्‍था व बँकाकडून  पिक कर्ज घेतलेले नाही अशा शेतक-यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com