Trending

6/recent/ticker-posts

शिक्षणाअभावी आदिवासी समाजाचे झालेले नुकसान... 

शिक्षणाअभावी आदिवासी समाजाचे झालेले नुकसान... समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकटीची असल्याने व डोंगर, दऱ्या, या भागात जास्तीत जास्त वास्तव्य असल्याने शहरीकरण व शिक्षणव्यवस्थे पासुन दुरवर समाजाचा संपर्क येत नव्हता. गुलामगिरी, वेठबिगारी,  सालगडी म्हणुन कुटुंबातील कर्ता पुरुष वर्षानुवर्षे अडकुन पडले होते, त्यावेळी कुटुंब नियोजन वैगैरे काहीच नसायचे त्यामुळे मुलांची संख्या ५/६ च्या वरच असायची,  मोठा मुलगा ९/१० वर्षाचा झाला का वडीलांच्या बरोबर कामाला लागायचा त्यामुळे शाळेशी त्यांचा संबंध येत नसत, आई - वडील अशिक्षित त्यामुळे शिक्षणाचा महत्व काय हेच त्यांना कळत नव्हत. त्यामुळे इतर समाजापेक्षा आपण शिक्षित किंवा प्रगत व्हायला  जवळजवळ २  दशकं मागे राहलो. अशिक्षित पणाचा फायदा घेऊन समाजाला खेळवत ठेवायचे काम त्यावेळेस केले गेले. राजकारतील आरक्षण असो वा नोकऱ्यातील आरक्षण असो त्यावेळेस बोगस पद्धतीने दाखले मिळवुन इतर समाजाने त्याचा फायदा करुन घेतला
      💥  शिक्षण नसल्यामुळे चांगल्या हुद्दद्यावर आपली माणसं नोकरी करु शकली नाही.  
      💥 शिक्षण नसल्यामुळे राजकिय व सामाजिक क्षेत्रात पाहिजे तसा ठसा उमटवु शकलो  नाही. 
       💥 शिक्षण नसल्यामुळे बालविवाह व बालमृत्यु थांबवु शकलो नाही. 
       💥 शिक्षण नसल्यामुळे व्यसनापासुन दुर गेलो नाही. 
       💥 शिक्षण नसल्यामुळे अंधश्रद्धा (भोंदुगिरी) मानत राहलो. 
       💥 शिक्षण नसल्यामुळे आपल्या हक्कासाठी, मागण्यांसाठी कधी एकत्र आलो नाही. 
        हे नुकसान समाजाचे फक्त  शिक्षणाच्याअभावी झाले आहे.  
      २१ व्या शतकात आपल्याला सर्वानाच शिक्षणाचे महत्व समजायला लागले आहे, समाजातील तरुण तरुणी चांगले शिक्षण घेऊन चांगल्या हुद्दद्यावर नोकरी करताना दिसत आहेत. डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, शिक्षक, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये समाजातील मंडली कर्तव्य बजावत आहेत, तसेच IPS, UPSC या सारख्या परीक्षा देऊन मोठ्या हुद्दद्यावर पण समाजातील काही मंडली आज कार्यरत आहेत हे सगले शिक्षणामुळे झाले. शिक्षण असे एक हत्यार आहे की, कोणताही प्रसंगातुन आपली सुटका करु शकतो. आज समाजातील सर्व शिक्षितांचे कर्तव्य आहे की,  आपल्या समाजाला योग्य दिशा देणे, शिक्षणाचे महत्व समजाऊन सांगणे, आरक्षण टिकवण्यासाठी सर्वानी एक होणे , वेळ आली तर आक्रमक पणे आंदोलन करणे हे सर्व समाजातील शिक्षितांचे काम आहे. सर्व समाज बांधवांना विनंती की, कुठलाही कार्यक्रम असो, संमेलने असो सर्व वक्तांनी/आयोजकांनी शिक्षण या मुद्दावर भाषणात भर द्यावा.
चला करुया एकच ध्यास, सुशिक्षित करुया आपला समाज...


अरुण खुलात


Post a Comment

0 Comments