Trending

6/recent/ticker-posts

महागाईच्या चुलीवरची धग सरकारला भस्मसात करणार- आनंद परांजपे

महागाईच्या चुलीवरची धग सरकारला भस्मसात करणार- आनंद परांजपेठाणे


घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत बुधवारपासून (12 फेब्रुवारी) वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने केलेल्या गॅसच्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकर्‍या भाजल्या.


 शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी  आणि कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोरच अनोखे आंदोलन करीत जोरदार निषेध केला. ‘बहुत हुई महंगाई की वार, चले जाओ मोदी सरकार:’ मोदी सरकार हाय-हाय; मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद; चुल्हा जलाओ- मोदी भगाओ” अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे चुल पेटवून भाकर्‍या भाजल्या.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी,“  मोदी सरकाने घरगुरती गॅस  सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ केली आहे.  महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेले हे सरकार केवळ श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगरीब माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे. तरीही, मोदी सरकार गॅस सिलिंडर या मूलभूत गरजेकडे लक्ष देत नाही. मोदी सरकारने केवळ प्रसिद्धीसाठी उज्ज्वल योजनेंतर्गत गॅस सिलिंडर  देणार्‍या या मोदी सरकारची गरीबविरोधी नीती आता जनतेच्या समोर आली आहे. त्यामुळे आता देशातील मायभगिनीच मोदी आणि भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी उत्सुक झाल्या आहेत, असे सांगितले. तर,  अच्छे दिनचे आश्वासन देत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आधी रेशनिंग दुकानात रॉकेल मिळत होते. तेदेखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आम्हा महिलांना गॅस सिलिंडरऐवजी चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चुलीची ही धगच मोदी सरकारला भस्मसात करेल, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनी केली


Post a Comment

0 Comments