Trending

6/recent/ticker-posts

कठोर प्लास्टिकबंदीला १ मेचा मुहूर्त

कठोर प्लास्टिकबंदीला १ मेचा मुहूर्तमुंबई
महाराष्ट्राचा ६०वा वर्धापन दिन 'येत्या १ मे रोजी  साजरा होणार आहे. या दिवसापासून एकदाच वापरता येण्याजोग्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा मानस आहे', असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच विधान परिषदेत जाहीर केले. 'सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग प्लास्टिकमुक्त बनविण्याचा प्रयत्न आहे. सरकारने प्लास्टिकबंदी केली असली तरी यात लोक सहभाग महत्त्वाचा असून, प्लास्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याच्या चळवळीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे', असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात सन २०१८मध्ये महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोलबंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, बंदी असतानाही त्याची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचा मुद्दा काँग्रेसचे सदस्य रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणला. त्या प्रश्नाच्या उत्तरात आदित्य ठाकरे यांनी, प्लास्टिकबंदीची १ मे पासून कठोर अंमलबजावणी होईल, असे संकेत दिले.


Post a Comment

0 Comments