Top Post Ad

विशेष मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद  हा प्रेरणा देणारा :  महापौर नरेश म्हस्के

विशेष मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद  हा प्रेरणा देणारा :  महापौर नरेश म्हस्के



ठाणे
सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आम्ही देखील कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. व्यंग घेवून जरी जन्माला आलो तरी आज आम्ही आमच्या व्यंगत्वावर मात करुन असामान्य कर्तृत्व सिध्द करु शकतो हे आज याची देही याची डोळा अनुभवता आले. स्पर्धेच्या निमित्ताने या विशेष मुलांनी केलेले संचलन, त्यांची जिद्द, मेहनत व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद निश्चीतच सर्वसामान्यांना प्रेरणा देणारा आहे असे कौतुकोद्गार महापौर नरेश म्हस्के यांनी देखील काढले. निमित्त होते धर्मवीर मैदान, कोपरी ठाणे पूर्व येथे आयोजित केलेल्या ठाणे महापौर चषक कला क्रीडा महोत्सवाचे.
          ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अपंग कल्याणकारी योजनेतंर्गत आयोजित केलेल्या महापौर चषक कला क्रीडा महोत्सवाचे  उद्घाटन आज २४ फेब्रुवारी रोजी महापौर नरेश म्हस्के  यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली झाले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी, महिला व बालकल्याण समिती सभापती जयश्री डेव्हीड, स्थानिक नगरसेविका मालती पाटील,  शर्मिला पिंपळोलकर, समाजविकास अधिकारी शंकर पाटोळे,जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्ये, कला केंद्राचे समन्वयक ‍किरण नाक्ती तसेच क्रीडा विभागाचे  कर्मचारी उपस्थीत होते.
अपंगत्वावर मात करुन शाळांमध्ये विविध केंद्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थी व व्यक्तींमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस या स्पर्धा चालणार असून या महोत्सवात एकूण १९ शाळा व संस्थांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या महोत्सवात गतीमंद, कर्णबधीर, अस्थीव्यंग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांमध्ये  ५० मीटर धावणे, ५० मीटर रिले, गोळाफेक या स्पर्धां तसेच सर्व दिव्यांगासाठी बादलीत चेंडू टाकणे या स्‌पर्धा घेण्यात आल्या. 
ठाणे महापालिकेने अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करुन मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा जो उपक्रम  राबविला आहे तो खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पालक मंजू मकवाना यांनी व्यक्त केले. गतीमंद मुलांसाठी त्यांच्या शाळा देखील स्पर्धा घेत असतात. परंतु अशा भव्य स्वरुपाचा महोत्सव आयोजित करुन सर्व दिव्यांग मुलांना एकत्र आणले हे चांगली बाब आहे. त्यामुळे याविशेष मुलांना आपल्यातील कला इतर मुलांसमोर देखील सादर करण्याची संधी मिळाली असल्याचे मत होलीक्रॉस ‍शाळेच्या पालक अनुजा पाटणे यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com