जन्मतः १३ कर्णबधिर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया
ठाणे जिल्हा पालकमंत्री ना एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध ENT तज्ञ डॉक्टर आशिष भूमकर यांनी केल्या मोफत शस्त्रक्रिया
ठाणे
कझाकिस्तान येथील 13 जन्मतः कर्णबधिर मुलांवर ठाणे शहरातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. प्रसिद्ध ENT तज्ञ डॉक्टर आशिष भूमकर यांस कझाकिस्तान देशाच्या अभ्यास दौऱ्यावर असताना जन्मतः कर्णबधिर असलेल्या मुलांच्या पाल्यांची भेट झाली होती. संबंधित मुलांच्या पालकांनी डॉ आशिष भूमकर यांस या मुलांच्या शस्त्रक्रिया भारतात करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ भूमकर यांनी ठाणे महानगरपालिका संचलित महावीर जैन हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया करण्याची विनंती ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांस केली होती. महावीर जैन हॉस्पिटलचे विश्वस्त महेंद्र जैन आणि पियुष जैन यांच्या सहकार्याने आणि डॉ आशिष भूमकर यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने गेल्या आठवडाभरात कझाकिस्तान मधील 13 लहान मुलांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. विशेष म्हणजे या शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर जन्मतः बहिरेपणा असलेल्या या सर्व मुलांना ऐकू येण्यास सुरुवात झाली आहे.
तर ठाणे शहरातील महावीर जैन हॉस्पिटलने आणि डॉ आशिष भूमकर यांनी विदेशातील रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करून इतिहास रचला आहे अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. यापुढील काळात देखील प्रसिद्ध ENT तज्ञ डॉ आशिष भूमकर सर यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाद्वारेच कझाकिस्तान आणि रशिया मधील जन्मतः कर्णबधिर मुलांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी सांगितले
0 टिप्पण्या