स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी जपला मैत्री धर्म
पेण
एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ काळखंडानंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पेण येथील आर्टस आणि कॉमर्स कॉलेज मधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या दिवंगत मित्राच्या परिवाराला आर्थिक साह्य करुन आपले ऋणानुंबध जपले आहेत. १९८९- ९० बी. ए. बॅचचे माजी विद्यार्थी एकत्रीत आले आहेत. व्हॉटस-ऍपच्या माध्यमातून मित्रांशी सुसंवाद साधतात. सुख- दुखाःच्या प्रसंगी मित्रांच्या घरी जावून स्नेहभाव जपतात. वर्षातून एकदा वार्षिक स्नेहसंमेलना बरोबरच कुटुंबातील सदस्यासह प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सहलीचे आयोजनही करतात. वृक्षारोपणा सारखे समाजिक उपक्रम प्राधान्यही दिले जाते.
मैत्री परिवारातील दिवंगत मित्राच्या परिवाराला आर्थिक साह्य करण्याचा पायंडा गतवर्षी पाडला गेला असून यावर्षी शिर्की येथील दिवंगत मित्र केसरीनाथ पाटील यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना दहा हजार रुपयेची मदत केली. ग्रुपचे समन्वयक अशिष म्हात्रे यांनी कॉलेज जीवनातील केसरीनाथ पाटील व मित्र परिवाराच्या आठवणींना उजाळा दिला. सौ. तृप्ती भोईर, गणेश म्हात्रे, सुनिल म्हात्रे, सौ. दिपिका भगत, मिनानाथ गांवड, हरिश्चंद्र गांवड आदी सदस्यांनी यावेळी मुलगा पार्थ याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या