Top Post Ad

क्लस्टर योजनेचे सर्व श्रेय शिवसेनेचेच - मुख्यमंत्री 

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत सुरु झालेल्या क्लस्टर योजनेचे सर्व श्रेय शिवसेनेचेच - मुख्यमंत्री 
मुख्यमंत्र्याकडून आयुक्त संजीव जयस्वाल यांचे  कौतुक



ठाणे, 
गेल्या अनेक वर्षापासून आपला जीव मुठीत धरुन जीवन जगत असलेल्या नागरिकांना सुटकेचा विश्वास मिळाला असून सर्व सोईनीयुक्त असे मालकीचे घर मिळणार आहे, गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्मयातून या योजनेचा पाठपुरावा होत असून याबाबतचे पहिले निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले होते व त्याच योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री  म्हणून मला करता आले याचे सर्व श्रेय नागरिकांचे असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नमूद केले. ठाण्यातील मंजूर क्लस्टर योजनेतंर्गत किसननगर येथील पहिल्या योजनेचा शुभारंभ आज ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या विविध नागरी विकास कामांचा ई-  भूमीपूजन देखील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्याचा विकासाचा ध्यास घेवून धडाडीने जे काम केले आहे, ते खरोखरच उल्लेखनीय आहे. मी स्वत: ठाणेकर आहे, या दृष्टीने त्यांनी  ठाण्याचा सर्वंकष विकास घडविला आहे, त्यामुळे निश्चितच ते ठाणेकरांच्या कायम लक्षात राहणार आहेत यात शंका नाही असे  सांगत ठाकरे यांनी आयुक्तांना सन्मानित केले. त्याचबरोबर  महापौर नरेश म्हस्के व माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनाही सन्मानित करण्यात आले.
 महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास  नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवरांसह  खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री रविंद्र फाटक, प्रताप सरनाईक, माजी आमदार सुभाष भोईर, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी,  शिवसेना उपनेते अनंत तरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुकत विवेक फणसळकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, ‍  अतिरिक्त आयुक्त राजेंद्र ‍ अहिवर, समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, ओमप्रकाश दिवटे यांच्यासह सर्व समित्याचे सभापती, सर्वपक्षीय नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर व महापालिका अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थीत होते.
 यावेळी ठाण्याच्या विकासासाठी जे - जे आवश्यक आहे ते मी मुख्यमंत्री म्हणून निश्चीतच सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याचे सांगत चतुर्थ श्रेणी  कर्मचारी व पोलीसांसाठी 10 टक्के सदनिका नवीन गृहनिर्माण प्रकल्पामध्ये राखीव ठेवण्याबाबतच्या सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री यांनी केल्या. तर एमएमआर अंतर्गत येणाऱ्या इमारतींचाही पुनर्विकास करणेबाबत कार्यवाही केली  जाईल असेही सुतोवाच मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.
            सदर कार्यक्रमात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी ठाण्याच्या विकासाचा धावता आढावा घेतला. महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाण्यात प्रथमच आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागत केले. तर मुख्‌यमंत्र्याच्या कारकीर्दीत ठाणे महापालिकेचे शासन दरबारी  प्रलंबीत असलेले विषय मार्गी लागतील असा विश्वास व्यकत करीत रोजगारनिर्मितीसाठी ठाणे शहराला विविध प्रकल्प देण्याची मागणी केली. यावेळी  अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com