Top Post Ad

केंद्राने दिल्लीत शांतता निर्माण करण्यासाठी मदत करावी - केजरीवाल

केंद्राने दिल्लीत शांतता निर्माण करण्यासाठी मदत करावी - केजरीवाल



नवी दिल्ली
 नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं. उत्तर- पूर्ण दिल्लीतील मौजपूर भागात सीएएविरोधक आणि समर्थकांमध्ये दगडफेक झाली.  पोलिसांनी संचलन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. खबरदारी म्हणून मौजपूर आणि बाबरपूर मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकरकडे मदतीची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि नायबराज्यपाल यांनी याची दखल घ्यावी आणि शांतता निर्माण करण्यासाठी मदत करावी, असं केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितलं.
 दिल्लीच्या काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.  सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये रविवारीही दगडफेक झाली होती. दिल्लीतील काही भागात तणावाची परिस्थिती आहे. पोलिस स्थितीवर नजर ठेवून आहेत. आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर आणखी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती आलोक कुमार यांनी दिली.  दिल्लीत ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या हिंसक आंदोलात दिल्लीत पोलिसातील एक हेडकॉन्स्टेबल ठार झालाय. तर पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यात कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. तसंच दोन नागरिकाचाही हिंसाचारात मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे हिंसाचारातील मृतांची संख्या तीनवर गेलीय. मृत्यू झालेल्या नागरिकांची नावं फुरकान आणि शाहिन अशी सांगण्यात येत आहेत. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे इशान्य दिल्लीतील शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत. तिथे परीक्षाही होणार नाहीत. सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
दिल्लीच्या जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमा झालेत. आंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरंही पेटवली. सीएएविरोधी या आंदोलनाला हिंसक स्वरुप आलंय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. जाफराबादमध्ये तणावाची परिस्थिती आहे. इथे एक आंदोलक खुलेआम रस्त्यावर गोलीबार करताना दिसून आला. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे. आंदोलकांकडून पोलिसांना लक्ष्य करण्यात येतंय. पोलिसांवर दारुच्या बाटल्या आणि दगडफेक करण्यात येत आहे. तर पोलीस नागरिकांना शांततेचं आवाहन करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com