Top Post Ad

वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोन


 (28 फेब्रुवारी विज्ञानदिन विशेष लेख)आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला नाही.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने प्रगत केलेली साधने वापरतो. विज्ञानाची करणी घेतली पण विचार सरणी आपण अंगिकारली नाही. समाजात अंधाश्रध्दा चिरकाळ टिकल्या त्याचे पहिल कारण आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हे आहे.‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ याचा एका शब्दामध्ये अर्थ - कार्यकारणभाव तपासणे. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतात, असं नाही. पण ती ज्या वेळी समजतील, त्या वेळी ती कशी समजतील, हे कार्यकारणभावामुळे मला समजते. हा ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे.
समाजात कधीच चमत्कार घडत नसतात तर ते कोणीतरी घडवून आणत आसते.त्यामध्ये एक तर हात चलाखी असते किंवा त्यामागे विज्ञान असते.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर सर्व चमत्कार तपासता येतात.आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ 'विज्ञानाच्या' आधारे झालेली आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पध्दती आहे. सत्यशोधनाचा मार्ग आहे. जीवनाचे दिशादर्शन आणि व्यक्तीला जानिवांचे स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टिकोनानेच प्राप्त होते. भारतीय संविधामुळे प्राप्त झालेल्या व मानवाला  अभिप्रेत असणाऱ्या कलम 51 नुसार विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.आपण मागे का आहोत तर  विज्ञानाकडे केलेलं दुर्लक्ष आणि आध्यात्माला दिलेला खोट्या विज्ञानाचा मुखवटा असल्यामुळे विज्ञानक्षेत्रात भारत मागे पडण्याचे प्रमुख कारण आहे.अध्यात्माचे, मोक्षप्राप्तीचे, जन्म-मरणाचे काल्पनिक फेरे चुकविण्याचे सार्वत्रिक वेड भारतात दिसून येते.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार झाला नाही.
भारतीय संविधानात नमूद केलेल्या भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व अंगीकार केला पाहिजे." "कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही,  यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन "निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग." या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पध्दत आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य नाकारतो. एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो.वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रंथप्रामान्य नाकारतो. कोणत्या एका पुस्तकात लिहिलेय म्हणून ते चिकित्सा न करता स्विकारणे हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच नम्र असतो. मी सांगितलेला शब्द अंतिम आहे,  असा दावा करीत नाही.तो नवनवीन सत्य पुराच्या आधारे स्वीकारत जातो.अर्थात  कोणत्याही घटनेच्या मागे कार्यकारणभाव आहे. म्हणजे कोणत्याही घटनेमागे कारण हे असतेच. हा स्विकार म्हणजेच वैज्ञानिक दृ़ष्टिकोन होय. 
आज समाजात अनेक गोष्टी 'यामागे विज्ञान आहे,अस सांगून जनसमान्यांच्या माथी थोपवल्या जातात. त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ठरवावे.विज्ञानाला आज सगळ्या गोष्टींची कारणे माहित नाहीत,पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या आधारेच समजू शकतात. जेव्हा आपण अवैज्ञानिक वागतो. तेव्हा आपण आपल्या जीवनाची सुत्र दुसऱ्याच्या हातात देतो. तुम्ही ज्या वेळी ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ स्वीकारता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं स्वतःच्या हातात घेता.वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करा.यात आपल आपल्या देशाचे भवित्य आहे.


संदिप  यशवंत गोवळकर  ( 9969045602)
रामचंद्र  अपार्टमेंट  न.2 साबा रोड
ठाणे दिवा पुर्व


                                        


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com