Top Post Ad

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ‘भारतरत्न’ने गौरव करावा- खासदार संभाजीराजे

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ‘भारतरत्न’ने गौरव करावा- खासदार संभाजीराजे



कोल्हापूर 
 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांचा ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरव करण्यात यावा. इतकच काय तर भारतरत्ना पेक्षा मोठा सन्मान असेल तो शाहू महाराजांना द्या अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.  शाहू महाराजांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ही उपाधी लावली नाही जी लोकांनी राजश्री ही उपाधी त्यांना दिली होती तीच त्यांनी आयुष्यभर लावली. त्यामुळे त्यांना भारतरत्न दिल तर उत्तमच आहे मात्र त्यापेक्षा देखील मोठी काही पदवी असेल तर ती त्यांना लागू होईल अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.  
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांचा ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरव करण्यात यावा. याबाबत राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.  यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजर्षी शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे होते. अनेक सुधारणांचे प्रणेते होते. आपल्या संस्थानात रयतेला प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा कायदा त्यांनी केला होता. तसेच विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग उभी करून मुलांच्या शिक्षणाला चालना दिली. बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन तसेच स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. सतत लोककल्याणासाठी झटणारे शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. या रयतेच्या राजाचे कार्य सर्वदूर पसरले आहे. ते सुधारणावादी समाजसुधारक होते.
आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज वयाच्या विसाव्या वर्षी कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. महात्मा जोतिबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे संस्थानात सामाजिक सुधारणांचे कार्य केले. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न किताब देण्यासाठी दोन्ही सभागृहांनी ठराव करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार जाधव व पाटील यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com