Trending

6/recent/ticker-posts

एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रवादीसोबत आता काँग्रेसही

एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रवादीसोबत आता काँग्रेसहीमुंबई: 
एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासात केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करून हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यास राज्य सरकारने सत्र न्यायालयात विरोध दर्शवला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमची यंत्रणा सक्षम असल्याचं राज्य सरकारनं सत्र न्यायालयात स्पष्ट केलं होतं. केंद्राच्या एनआयएकडे हा तपास देता कामा नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारात हा तपास एनआयएकडं देण्यास मान्यता दिली. त्यामुळं शरद पवार नाराज झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या प्रकरणाची समांतर चौकशी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी गृहखात्याच्या अखत्यारीत स्वतंत्र एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे.
या प्रकरणी पोलिसांची भूमिका योग्य नव्हती. त्यामुळं हे प्रकरण एसआयटीकडं देण्यात यावं, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली होती. त्यावर काही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र हे प्रकरण आता एनआयएकडे सोपवण्यात आले आहे. याला विरोध दर्शविणाऱ्या  राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची साथ मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा आहे. दलित व आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव तर नाही ना,' अशी भीती महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


Post a Comment

0 Comments