Trending

6/recent/ticker-posts

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा राज्यपालांच्या हस्ते गौरवठाणे 
 साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुल ऑफ पॅकेजिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सेंटर तर्फे पॅकेजिंग क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्यासाठी  देण्यात येणारे पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संस्थेच्या नेरुळ, नवी मुंबई येथील प्रांगणात शनिवार ८ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आले. यावेळी   साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, स्कुल ऑफ पॅकेजिंगचे अध्यक्ष प्रो. पी.व्ही. नारायणन, जागतिक पॅकेजिंग संस्थेचे प्रतिनिधी ए व्ही पी एस चक्रवर्ती , एस आय ई एस चे मानद सचिव एम .व्ही. रामनारायणन आदी उपस्थित होते. 
यावेळी राज्यपाल म्हणाले, पॅकेजिंग ही आता काळाची गरज आहे. व त्यात संधीही विपुल प्रमाणात आहेत.या क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी यांनी नवनवीन प्रयोग आणि संशोधन करून नवीन संकल्पना रुजविण्याची आवश्यकता आहे.  वस्तूच्या दर्जापेक्षा त्याचं बाहेरील आवरण किती आकर्षक आहे यावर त्याची विक्री किंवा मागणी ठरू लागली आहे. आकर्षक पॅकेजिंगमुळे वस्तूंची मागणी वाढली आहे. सद्या उत्पादन कंपन्यांमध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असुन  पॅकेजिंगमध्ये  नवीन प्रयोग करत आपले उत्पादन  जास्तीत जास्त दर्जेदार व आकर्षक करण्यावर  भर दिला जातो आहे.  ही बाब अतिशय कौतुकास्पद बाब आहे. पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सेंटरने नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या  क्षेत्रातील संशोधनास चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 
स्कुल ऑफ पॅकेजिंगचे अध्यक्ष प्रा.  पी.व्ही. नारायणन यांनी प्रास्तविक केले.  उत्कृष्ट पँकाजिंग साठी विविध क्षेत्रातील ४५ व्यावसायिक कंपन्यांना यावेळी  पुरस्कार प्रदान करण्यात आले.


Post a Comment

0 Comments