Top Post Ad

राजकारणातील विचारसरणीचा सोयीस्कर वापर

राजकारणातील विचारसरणीचा सोयीस्कर वापर - प्रविण मोरे



दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर अरविंद केजरीवाल विराजमान झाले. भारतीय राजकारणामध्ये एक मोठा विजय मानला जातो. बलाढ्य अश्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष झालेला पराभव, केजरीवालांनी दिल्लीचे तक्त राखलं,  दिल्ली निवडणूकीचा असे  अनेक संदर्भ प्रसारमाध्यमांमध्ये पुढे आणले. लोकांनी त्याला साथ दिली, चर्चा केली विचारमंथन केल काही समर्थनार्थ तर काही विरोधात. मात्र विजय केजरीवाल यांचा झाला हे नक्की,  गड राखला केजरीवालांनी. त्यांचा शपथविधी पार पडला,  
शपथविधी मध्ये त्यांनी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतली त्या अनुषंगाने मला या विषयावर काहीतरी भाष्य करावे असे वाटले. त्यांच्या प्रचारादरम्यान काही गोष्टी समोर आल्या,  तुम सावरकर पढाव मे बाबासाहेब आंबेडकर पढाता हु! केजरीवालांच्या विरोधात असणारे सर्व संविधान विरोधी आणि ते संविधान समर्थक, विरोधक जातीवादी धर्मांध शक्ती आणि ते धर्मनिरपेक्ष किल्ला यशस्वी झाले मात्र मतदानाला जाण्यापूर्वी हनुमानाच्या मंदिरात गेले आणि त्यांनी मतदारांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की सेक्युलर आहे. 
इतर लोक भ्रष्टाचारी बलाड्य साधनसंपत्ती वाले आणि ते मात्र आम आदमी, ह्या भावना योग्य  पद्धतीने प्रचारामध्ये आणल्या व त्यामध्ये यशस्वीही झाले.  वाटले होते भारतीय संविधानाला प्रमाण मानून सद्सद्विवेक  बुद्धीने केजरीवाल शपथ घेतील.  पुन्हा एकदा भारतीय राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी कदाचित त्यांना हनुमान चालीसा,  हनुमान मंदिर आणि ईश्वराला साक्षी ठेवाव लागत असेल असं मला वाटत. या अनुषंगाने आपण पाहतो विविध आंदोलन असतील वेगवेगळे सत्याग्रहात गांधीजींची प्रतिभा आणि प्रतिमा वापरून काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिभा आणि प्रतिमा यांचा वापर केला जातो.  
सत्याचा आग्रह करण्यासाठी त्याचा उपयोग करतात का?  आणि प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये या मूल्यांना व विचाराला जो धर्म मानतात. रस्त्यावर आल्यानंतर ते गांधीवादी किंवा आंबेडकरवादी होतात व घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या धर्मामध्ये हिंदू असतात, मुस्लिम असतात असे मला वाटते त्यामुळे एकूणच राजकारणामध्ये या विचारसरणीचा उपयोग सोयीस्कर पद्धतीने केला जातो का? त्याचे उत्तर समर्थनार्थ आणि हो असंच आहे,  कारण की जेव्हा राजकीय सत्ता हातातून गेली की महाराष्ट्रातल्या राजकारणात पाहतो आमच्यावर अन्याय झाला की ओबीसी, अल्पसंख्यांक किंवा दलित म्हणून आमच्यावर अन्याय झाला आणि जेव्हा तुमच्या हातून व  सत्ता तुमच्यापासून दूर जाते तेव्हा मागासवर्गीय दलित ओबीसी आमच्यावर अन्याय झाला असे बोलता. 
सदर वर्ग सत्तेत असताना आपण पाहिलेला आहे त्याला सत्ता मिळाल्यानंतर आपण पाहिलेला आहे त्यामुळे निवडणूकीच्या अगोदर ते ओबीसी आणि इतर वर्गातली असतात आणि सत्ता मिळाल्यानंतर मोठ्या थाटामाटात यामध्ये सत्यनारायण आणि ग्रह प्रवेश, साधुसंत गुरु-भक्त होतात आणि आपण पूर्वाश्रमीचे हिंदू असतात. महिला बालकल्याण,  समाज कल्याण मंत्री म्हणून शपथ घेतली जाते, फुले, शाहू आंबेडकर यांच्या आणाभाका घातल्या जातात व शपथ घेत असताना सुद्धा पुरोगामी बनतात. मात्र कार्यालयात प्रवेश करत असताना किंवा ग्रहप्रवेश करताना ते आपल्या धार्मिक ओळखिला प्राधान्य देत असतात मग सत्या राबवने कसे विवेकबुद्धीने होणार हा प्रश्न आहे. 
कारण की मतदान मिळवण्यासाठी व रस्त्याच्या संघषात आपण एका विचारसरणीचे व सत्ता प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या मुळ रूपांमध्ये येतो असं काहीतरी होतय असं मला वाटतं. संविधानाच प्रमाण देऊन राजकारणामध्ये वावरणाऱ्या अनेक माणस आपण पाहिली, डॅा बाबासाहेब आंबेडकरांच तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाव घेतलं जातं जणू काही त्यांच्या विचाराचे अनुयायी तेच फक्त आहेत. मात्र सत्ता हस्तगत केल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदर्शावर चालायचं सोडून विचारसरणीच्या विरोधात सुद्धा गेलेले दिसून येतात. त्यामुळे या देशातल्या आंबेडकरवाद्यांनी आणि संविधानावर आणि पुरोगामी  विचारसरणीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी सावध झाले पाहिजे, 
अशा ढोंगी लोकांच्या निवडणूकीत काम नाही केले पाहिजे. निवडणूकी आगोदर व झाल्यानंतर एकच असतात आणि सत्ता मिळाल्यावर सुद्धा बदलत नाहीत व विचारावर ठाम असतात तेच राजकारण व  समाजकारण यात टिकू शकतात व  सत्ता देता वेळ आपल्या कुटुंबाला व आपल्या वारसा जपणाऱ्या लोकांना न देता सर्वसमावेशक कार्यक्रम व कार्यकर्ते यांना न्याय देतील, ह्यांना आपण ओळखले पाहिजे व त्यांच्यात पाठीशी उभे राहिले पाहिजे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com