Top Post Ad

वॉटर बेल उपक्रम अंमलबजावणीसाठी मनविसे आग्रही

वॉटर बेल उपक्रम अंमलबजावणीसाठी मनविसे आग्रही



ठाणे
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार वॉटर बेल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शालेय कालावधीत पाणी पिण्यासाठी तिन वेळा बेल वाजवणे आवश्यक आहे. या बेलनुसार काही मिनिट मुलांना पाणी पिण्यासाठी द्यावा अशी सूचना शासनाने केली आहे. मात्र संपूर्ण ठाणे शहरात वॉटर बेल उपक्रमाची (पाणी पिण्याची सूचना) अंमलबजावणी होत नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या अशा उपक्रमाविषयी शाळा टाळाटाळ करत असाव्यात असे निदर्शनास येत असल्याचे या निवेदनात नमूद करून ठाणे शहरातील अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व शाळांमध्ये वॉटर बेल उपक्रमाची (पाणी पिण्याची सूचना) अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व ठाणे महापालिकेचे उपआयुक्त (शिक्षण) यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. यावेळी मनविसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील, ठाणे शहर सचिव सचिन सरोदे, ठाणे उपशहर अध्यक्ष संदिप चव्हाण, उपशहर अध्यक्ष दीपक जाधव, विभाग अध्यक्ष हेमंत मोरे व ऋषिकेश चौधरी, उपविभाग अध्यक्ष हर्षद कांडोळे, विशाल पाटील आणि उपशाखा शाळांमध्ये वॉटर बेल उपक्रमाची अंमलबजावणी करावी - मनविसेची मागणी अध्यक्ष हेमंत गायकवाड उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com