Trending

6/recent/ticker-posts

प्रत्येक महाविद्यालयात शिवजयंती साजरी व्हावी

प्रत्येक महाविद्यालयात शिवजयंती साजरी व्हावी - मराठा सेवा संघाची मागणीठाणे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व महाविद्यालयांत उत्साहात साजरी व्हावी या मागणीसाठी आज ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य मराठे सर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रत्येक महाविद्यालयात खूप मोठया प्रमाणात साजरी करावी यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थी वर्गांनी मराठा सेवा संघ ठाणे जिल्हा शहर यांच्याशी संपर्क केला असता सदर विषयाबाबत  मराठा सेवा संघानी तात्काळ दखल घेवून ज्ञानसाधना महाविध्यालयाचे प्राचार्याना मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले व प्राचार्यानी छत्रपती शिवाजी महाराज जयंती पी. सावळाराम सभागृत मोठया प्रमाणात साजरी करू असे आश्वासन दिले.


Post a Comment

0 Comments