पुणे : कांद्याचा दर गेल्या महिन्यात प्रतिकिलो दीडशे रुपये असा उच्चांकी झाला होता. मागणीच्या तुलनेत अपुरी आवक होत असल्याने महिनाभरापूर्वी 'भाव' खाण्या कांद्याचा दर टप्याटप्याने कमी होत आहे. दर कमी होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असून बाजारात नवीन कांद्याची आवकही सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार ४० ते ७० रुपये या दराने होत आहे. नगर जिल्ह्यातीलकमी होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असून बाजारात नवीन कांद्याची आवकही सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार ४० ते ७० रुपये या दराने होत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड भागातून लाल हळवी कांद्याची मोठी आवक सध्या होत आहे. नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर बाजार समितीच्या आवारातही कांद्याची आवक वाढली आहे. दक्षिणेकडील राज्यातून असलेली कांद्याची मागणी कमी झाल्याने येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी कमी होतील. कर्नाटकातील कांद्याची तेथील स्थानिक बाजारात आवक सुरू झाली आहे. तुर्कस्तान, इजिप्त तसेच कझागिस्तान येथून आलेला कांदा बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. त्याबरोबरच पुणे विभागातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे, अशीही माहिती पोमण यांनी दिली. जुन्या कांद्याचा साठा संपला असून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. पुढील आठवडाभर कांद्याचे दर स्थिर राहतील. त्यानंतर आवक वाढून कांद्याचे दर आणखी कमी होतील, असे कांदा व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ५०० ते ७५० रुपये असे दर मिळाले होते. रविवारी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ३५० ते ४५० रुपये असे दर मिळाले. अवेळी पावसाचा कांद्याला फटका बसला. त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. अपुरी आवक आणि वाढत्या मागणीमुळे कांद्याला उच्चांकी दर मिळाले. जुन्या कांद्याची आवकही अपुरी झाली होती. कर्नाटकात झालेल्या अवेळी पावसामुळे तेथील कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. कर्नाटकातून होणारी कांद्याची आवक ठप्प झाली होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात कांद्याचे दर दीडशे रुपयांच्या पुढे गेले होते. सध्या पुणे विभागातील नगर जिल्ह्यातून कांद्याची सर्वाधिक आवक होत आहे.
0 टिप्पण्या