मुंबई - चर्चगेट येथील फुटपाथ वर पथारी टाकून पसरत आलेल्या महादेव कोळी पारधी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. भल्या भल्यांना अजून एक एनआरसी आणि सीएएचं गांभीर्य समज समजलेलं नाही, तिथं या फुटपाथवर राहण्या, आशिक्षित, दरिद्री बायकांना काय कळणार? त्यामुळे याचं भवितव्य काय असा सवाल लोकांचे दोस्त संघटनेचे रवी भिलाणे यांनी उपस्थित केला आहे. जनता दल मुंबईच्या महासचिव ज्योती बडेकर यांनी अ आयोजित केलेल्या या बैठकीत एनआरसी आणि सीएए वर ते बोलत होते. भर दुपारच्या उन्हात पाच पन्नास बाया माणसं जमा झाली. त्यांनीच सांगितलं, दुनया दिवशी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे बाकीची बायका पोरं तिरंगे झेंडे विकायला गेली होती.आणि प्रजासत्ताक दिन असल्यामुळेच पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईत सापडू नये म्हणून गडी माणसं परागंदा झाली होती. त्यामुळे यांच्यासमोर काय बोलायचं असा मलाही प्रश्न पडला होता. त्यामुळे लेक्चर देण्याच्या भानगडीत पडलो नाही.सरळ प्रश्नोत्तरे सुरू केली.कुठून आलात, कधी आलात,गाव कोणतं,जात कोणती,कोणी शिकलंय का,काही कामधंदा आहे का असल्या प्रश्नांना थातुरमातुर उत्तरं येत होती. मात्र गावाकडे एखाद्या जमिनीचा कागुद किंवा त्यांच्या आई बापाच्या शाळेचा एखादा दाखला आहे का या प्रश्नावर सरसकट एकच उत्तर आलं.नाही ! कोणत्यातरी दुष्काळात ही सगळी माणसं जीव जगवायला मुंबईत आली होती.गाव असं नव्हतं,पण शिवारही सोडून आली होती. मुंबईत जीव तर जगला पण शिक्षण,नोकरी-धंदा असं काय नाय गावलं.तेव्हा आन पाण्याचा दुष्काळ अन आता तर अस्तित्वावरच दुष्काळाचं सावट आलंय. गाव शिव,शाळा- मळा,बाप जादयांचा ठाव ठिकाणा नाही,त्यांनी आता मायबाप सरकारला कोणती कागदपत्रं दाखवायची? जगाला कसं पटवून द्यायचं त्यांनी...आम्ही पण भारतीय नागरिक आहोत म्हणून? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मला पडलेला हा सवाल माझ्यासारखाच तुमचाही पिच्छा पुरवल्याशिवाय राहणार नाही. आणि हा सवाल फक्त या पारध्यांचा नाही तर देशातील तब्बल पाच कोटी लोकसंख्या असलेल्या भटक्या समाजांचा आहे. पारध्यांची पुन्हा पारध होऊ नये इतकच ! अशी भीती रवि भिलाणे यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या