Top Post Ad

बुद्धाचे अर्थशास्त्रीय व्यावहारिक मार्गदर्शन


भारतातील बहुसंख्य समाजाच्या चळवळीचा बराचसा काळ हा सामाजिक प्रतिष्ठा सामाजिक समता आणि राज्यघटनेनुसार असणारे हक्क प्राप्त करण्यासाठी खर्च झालेला आहे. या संघर्षातून फार मोठ्या प्रमाणात लाभ झाला नसला तरी देखील बहुजनाच्या अस्मितेची किनार या चळवळीने शाबूत ठेवली हेही नसे थोडके. परंतु जीवनाच्या आर्थिक अंगाकडे या चळवळीचे फारच दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे आंबेडकरी बहुजन समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसात तर झालेच पण त्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की या चळवळीने महत्त्वाच्या अनेक मुद्यांवर वैचारिक गोधळ निर्माण करून वेळोवेळी ठिकठिकाणच्या आंबेडकरी अनुयायांची दिशाभूल केलेली आहे... मान्य आहे की मामसांला मन असते. पण म्हणून मनाने योग्य विचार त्याचवेळी करतो जेव्हा त्याच्या पोटाचे समाधान होते. 

बुद्धाच्या बाबतीतच पहा ना.... सिद्धार्थ दु:खमुक्तीचा मार्ग शोधण्यास निघाला. आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून घोर तपस्या केली. अगदी पाठीचा कणा आणि पोट यांच्यातील फरक न कळेपर्यंत पण काही उपयोग झाला काय? सुजाताने दिलेली खिर ग्रहण केल्यानंतरच बुद्धाच्या ज्ञानप्राप्ती झाली आणि तो बुद्ध झाला. हे नेमके आपण विसरतो. २५ नोव्हेंबर १९४६ मध्ये घटनासमितीत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणाची ही काही विधान पहा ___'राजकीय जिवनात आपल्याकडे समानता असेल आणि सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्याकडे विषमता विशाल असेल... केव्हापर्यंत आपण आपल्या समाजिक आणि आर्थिक जीवनातील समानता नाकारण्याचे चालूच ठेवणार आहोत' सध्याच्या घडीला आपण आर्थिकतेच्या बाबतीत योग्य आमि उपयुक्त धोरण निश्चित करणे ही काळाची गरज आहे. 

आपण साऱ्या बहुजनांस आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात समतोलीत विकास साधायचा आहे. असा समतोलीत विकास जर आम्हास करावासा वाटत असेल तर प्रत्येक बहुजन व्यक्तीने कुटुंबाने बुद्धाच्या आर्थिक आणि व्यावहारिक तत्वज्ञानाचे अनुसरण केलेच पाहिजे. __बुद्ध कोण आणि काय होता? बौद्ध साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्वान मंडळींनी हे मान्य केले आहे की, बुद्ध हा तुमच्या आमच्यासारखाच पण असामान्य बुद्धीमत्तेचा एक मनुष्य होता. तो पुराव्यानिशी हे सिद्ध करतात की, युद्ध हा धर्मसंस्थापक, महान समाजशास्त्रज्ञ, आदर्शवादी, विद्रोही कवी, समिक्षक, उत्कृष्ट मार्गदर्शक, जगाचा शिक्षक, विज्ञानवादी, सुक्ष्मदृष्टी असणारा निरीक्षक कुशल निवेदक आणि सकारात्मक विचार करणारा जगातील पहिला बुद्धीजीवी होता. बुद्ध हा अर्थ मार्गदर्शक आणि व्यवहारवादी सुद्धा होता हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. बुद्धाने किंवा बौद्ध साहित्याने 'अर्थ' या संकल्पनेवर काय भाष्य केले? अर्थ हा संस्कृत शब्द आपण सर्वच बुद्धाचे आपल्या मराठी भाषेत वापरतो. हा शब्द आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर पैशाची रास आमि पैशासंबंधीत व्यवहार तरळतात. बौद्ध साहित्यात अर्थ या शब्दाचे हेच स्पष्टीकरण आहे काय? निश्चितच नाही. पाली भाषेत अथ्थ (अर्थ) ही विशाल तसेच व्यापक संकल्पना आहे. ती संस्कृत भाषेप्रमाणे संकुचीत नाही. 

अथ्थ म्हणजे यश. मानवी जीवनाच्या विविधांगी पैलुंच्या विकासात प्राप्त केलेले यश असा मनुष्याने अत्थ या संकल्पनेचा व्यापक अर्थ बौद्ध साहित्यात आढळतो. केलेल्या आर्थिक, सामाजिक, राजनैतिक, शैक्षणिक, विज्ञान आणि आरोग्य, कायदा सुव्यवस्था, नैतिकता आणि सदाचरण या सर्व घटकांचा सुसंवादी संयोग आणि या संयोगातून उपघटकांवर जर का समाजाची भरभराट होत असेल आणि समाजाचे शांततामय अस्तित्व टिकून राहत निर्माण असेल तरच तेथे अत्थ ही संकल्पना जन्म घेते. पहा या उताऱ्यात बुद्धाने आणि बौद्ध साहित्याने अर्थशास्त्राचे मापदंडच निश्चित केले आहेत. बुद्धाचे अर्थ सिद्धांत आणि त्याचा व्यवहारवाद सद्यस्थितीत आपणास उपयुक्त आहे काय? 

आर्थिक संकल्पनावर लेखन मनुष्याने करणाऱ्यांचे दोन मोठे गट पाडता येतात.
किंवा १. भांडवलशाहीवादी  २. साम्यवादी 

बुद्ध आणि बौद्ध साहित्य आपणास भांडवलशाहीकडे किंवा साम्यवादाकडे पुर्णत । झुकवत नाही. बुद्धाच्या मार्गाने गेल्यास कर्ज आपणास वरील दोन्ही संकल्पनांचा संयोग दिसेल. युद्धाने आपणांस मध्यम मार्ग विशेष दाखविलेला आहे. जो मानव कल्याणाचा मार्ग आहे, असे असताना बुद्धाचे आणि बौद्धांचे अर्थशास्त्रीय सिद्धांत आणि व्यवहारवाद आपणास उपयुक्त ठरणार नाहीत असे होईल थोडीफार काय? । आर्थिक आणि व्यावहारिक तत्वज्ञान आर्थिक स्थिरता आणि सामाजिक स्वास्थ्य यासाठी बुद्धाने आणि बौद्धांनी तीन मुख्य घटकांचा विचार केला. ★ उत्थान सम्पदा ★ आरक्खा सम्पदा ★ समाजीवकता उथ्थान सम्पदा- या घटकात मनुष्याने आपल्या कृतिशील परिश्रमाने आणि आपल्याकडील बौद्धधम्माच्या आधारे निर्माण केलेल्या सम्पत्तीचे विश्लेषण बुद्ध आणि बौद्ध साहित्य करते. त्या काळी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीवर विचार करून बुद्धाने खालील उपघटकांवर जास्त लक्ष केंद्रित केलेले दिसते. ज्या घटकांच्या माध्यमातून मनुष्य सम्पत्ती निर्माण करू शकतो. 

१. कृषी-शेतीवर आधारीत उद्योग-व्यवसाय 
२. व्यापार 
३. उपयुक्त जनावरांचा निपज 
४. संरक्षण सेवा 
५. सरकारी सेवा 
६. व्यावसायिक सेवा 

आरख्खा सम्पदा- या घटकात मनुष्याने निर्माण केलेल्या सम्पत्तीचे संरक्षण किंवा जपणूक करून तिला उत्तरोत्तर कशी वाढाववी हे सांगितले आहे. खालीलप्रमाणे आपण आपल्या सम्पत्तीचे रक्षण करू शकतो. 

१. परत करण्याची क्षमता नसताना कर्ज न घेणे बुद्धाने कर्जमुक्त मानव-जीवनावर विशेष भर दिलेला आहे. कर्ज निराशमय आणि दुःखीत जीवनाचे एक महत्त्वाचे कारण आहे. 

२. प्राप्त केलेल्या सम्पत्तीपैकी थोडीफार बचत करणे अर्थशास्त्रीय बुद्ध म्हणतो, सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त असणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाला वेळप्रसंगी त्याने केलेल्या बचतीच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या, सावरणाऱ्या आणि आधार देणाऱ्या मनुष्याचा आनंद द्वीगुणीत होतो. अशा प्रकारे बुद्धाने आपणांस बचतीचे महत्त्व सांगितले आहे. 

३. उत्पन्नाच्या विनिमय बुद्ध आपणांस आपल्या उत्पन्नाचा खालीलप्रमाणे विनिमय करण्याचे मार्गदर्शन देतात. संपुर्ण उत्पन्नाचे चार भाग करून एक भाग दैनंदिन उपजिवीका व इतर सामान्य व्यवहारावर खर्च करावा. दुसरा भाग आपल्या व्यवसायात गुंतवावा तिसरा आणि शेवटचा भाग भविष्यात घडणाऱ्या अस्थिरतामय घटनांसाठी राखून ठेवावा. 

समाजिवेकता- उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करून जगणे म्हणजे सामाजिकता कोणत्याही कुटुंबातील व्य्कतीला जर आपण उत्पन्नाचा उपयोग आनंदाने घ्यायचा असले तर त्याने उत्पन्नाचा अतिरिक्त वापर टाळावा. त्याचबरोबर कमीत कमी खर्च करण्याची कंजुशी वृत्तीदेखील टाळावी. या दोन्ही वृत्ती त्या मनुष्याच्या उपभोगाच्या आनंदावर माती ओढतात. ग मनुष्याने सुखी- समाधानी राहण्यासाठी काय करावे? दुरितांच्या अंधुक प्रकाशाने गोंधलून न जाता आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च करावा, मग त्या मनुषअयास गृहपती सुखाचा आणि भोग सुखाचा आनंद लुटता येतो असे बुद्ध म्हणतात. 

मनुष्याने आपल्या उत्पन्नाचा आणि संपत्तीचा कशा प्रकारे विनिमय करावा यासबंधीचा सल्ला बुद्धाने ‘परकामा सुत्ता मध्ये दिला आहे. 

१. प्राथमिक गरजा- अन्न, वस्त्र आणि इतर गरजा 
२. माता-पिता, पत्नी मुले आणि सेवकांची व्यावस्था ठेवण्यासाठी येणारा खर्च 
३. आजारपण आणि अचानक उद्भवलेल्या समस्यांसाठी येणारा खर्च 
४. दानधर्म करण्यासाठी येणारा खर्च 
५. नातेवाईक भेट देणारे इतर व्यक्ती यांच्या आदरातिथ्यासाठी येणारा खर्च 
६. स्मुतीर्थ धम्मदान करणे 
७. विविध करांचा भरणा करणे 

जगातील सर्वच अर्थतज्ञांनी अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, असे सांगितले. पण बुद्ध या सर्वांच्या पुढे जाऊन असे म्हणतात की, मनुष्याच्या प्राथमिक गरजा किंवा आवश्यकतार चार १. अन्न-भोजन २. वस्त्र ३. निवारा आणि ४. मनाचा विकास जर माणसाच्या मनाचा विकास झाला नसेल तर तो माणूस अन्न मिळवणए हेच ज्यांचे विश्व अशा मुकबधीर जंगली प्राण्यांच्या तुलनेचा ठरतो. वास्तविक मनाच्या अपूर्ण विकासामुळे अन्न, वस्त्र आणि निवारी मिळवण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक प्रगीत व्हावीशी वाटत असेल तर त्याने अन्न, वस्त्र निवारा आणि माचा विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न करावा. आपल्या मनाचा विकास साधण्यासाठी बुद्धाने शिक्षण विचार आणि आचाराचे तत्व सांगितले आहे. 

आर्थिक अस्वस्थता, अस्थिरता कमी करून तिचे अस्तित्व संपवण्यासाठी बुद्धाचे वरील तत्व उपयोगी पडते. हा लेख अतिशय संक्षिप्त आहे. परंतु या सपुर्ण लेखाचा आपण सर्वकष आणि खोलात जाऊन विचार केल्यास बुद्धाने अर्थशास्त्र आणि व्यवहारवादाच्या बाबतीत विचार्लया जाणाऱ्या मुळ प्रश्नांनाच हात घालून त्यांचे समाधान केल्याचे निदर्शनास येते. ते प्रश्न असे १. संपत्ती कशी निर्माण करावी? आणि कोणत्या माध्यमातून? २. प्राप्त संपत्तीचे संरक्षण करून तिला उत्तरोत्तर कशी वाढवावी? ३. उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करून आर्थिक अस्थिरतेवर नियंत्रण कसे करावे? बुद्धाने दिलेला हा आर्थिक आणि व्यवहारवादाचा साचा परिस्थितीप्रमाणे थोड्याफार प्रमाणात बदलून आजही आपण आपल्या आर्थिक दुर्बलपणाचे प्रश्न समर्थपणे हाताळू शकतो. बुद्धधम्म हा जीवन मार्गदीप आहे. तो जगातील सर्व अज्ञान दूर करून आपणांस प्रत्येक क्षेत्रात योग्य मार्ग दाखवतो. हा आर्थिक आणि व्यावहारिक मार्ग, पहा त्याचे आकलन करा आणि त्यावर मार्गक्रमणा करण्यास सिद्ध व्हा! तुमचे जिवन सर्वांगानी समृद्ध आणि सुखमय झाल्याशिवय राहणार नाही. 

भवतू सब्ब मंगलं. - 

सम्राट अशोक जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com