Trending

6/recent/ticker-posts

त्या संघटनेला दहशतवादी घोषित करा- राजरत्न

___ बंगळुरू- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आरएसएसवर दहशतवादी संघटना असल्याचे आरोप केले आहेत. रविवारी कर्नाटकमधील एका कार्यक्रमात आरएसएसवर बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, "आरएसएस एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेला बंद करायला हवे. माझ्याकडे पुरावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजुला एक साध्वी बसल्या होत्या आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाल्या की, भारतीय लष्कराकडील शस्त्र साठा जेव्हा संपला होता, तेव्हा आरएसेसने त्यांना तो सर्व शस्त्रसाठा पुरवला होता. 'मी यांना विचारतो की, एवढा आरएसएसकडे इतका मोठा शस्त्रसाठा कुठून आला, इतक्या बंदुका कुठून आल्या? पंतप्रधानांच्या बाजुला बसून या साध्वी वक्तव्य करतात. एखाद्या घरात बॉम्ब मिळाला असेल, तर त्या घराला किंवा घरातील सदस्यांना दहशतवादी ठरवले जाते. त्यामुळे अशा संघटनेकडे इतका शस्त्रसाठा असले, तर त्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले जाऊ शकत नाहा का? यांच्या संघटनेतील लोक आज दहशतवादी कारवायांमध्ये पकडले जात आहेत, अशा संघटनेला जगभरात बॅन करायला हवं, असं यावेळी राजरत्न आंबेडकर म्हणाले. सीएएच्या तरतुदीबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, भाजपा सरकार निवडणुकीत भाजपाला मतदान करणारे मतदार इतर देशांतील नागरिकांना आणत नाहीत. जोपर्यंत सरकार सीएए रद्द करत नाही तोपर्यंत देशभरात निदर्शने करण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. संबोधित करताना त्यांनी खुलासा केला की १ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांनी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग (यूएससीआयआरएफ) कडे एक याचिका सादर केली होती. या याचिकेत त्यांनी असा आरोप केला की भारत 'हिंदू राष्ट्र' मध्ये बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. युएससीआयआरएफ पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर बंदी घालण्याच्या विचारात आहे, असा आरोप त्यांनी केला.


Post a Comment

0 Comments