Top Post Ad

माजी आमदार गीता जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

 मिरा-भाईंदरच्या तत्कालिन आमदार गीता जैन यानी महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांवर संताप व्यक्त करताना कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांना चापट मारली त्याची कॉलर धरून आरडाओरड करतानाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. 16 जून 2023 रोजी मिरारोड परिसरातील पेणकर येथील कक्कड इमारतीलगतच्या झोपडपट्टी भागात घडली होती. या प्रकरणात गीता जैन  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला असून, काशीमिरा पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 352, 353, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून एका घरावरील तोडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत घर उद्ध्वस्त झाल्याने तेथील रहिवासी, महिला आणि लहान मुले पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावर आले होते. या घटनेची माहिती मिळताच गीता जैन घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, “शासनाचे पावसाळ्यात बांधकामांवरील कारवाई न करण्याचे आदेश असताना पालिकेमार्फत ही कारवाई का करण्यात आली?” असे त्यांनी म्हटले होते.   घटनेदरम्यान अभियंता शुभम पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतापाच्या भरात जैन यांनी त्यांना कानशिलात लगावली, असा आरोप करण्यात येत होत्या. 

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना गीता जैन यांनी आपल्या कृतीबाबत खेद व्यक्त केला होता. “महिलांच्या डोळ्यांतून अश्रू येत असताना तो अधिकारी हसत होता. ते पाहून माझा ताबा सुटला. मी कायदा मोडला हे मला मान्य आहे, पण त्या क्षणी ती कृती आपोआप झाली,” अशी प्रतिक्रिया गीता जैन यांनी दिली होती. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाल्यानंतर, आम आदमी पक्षाने सादर केलेल्या तक्रारीचा विचार करून न्यायालयाने काशीमिरा पोलिसांना गीता जैन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी आता या प्रकरणाचा सविस्तर तपास होणार आहे. या प्रकरणात माजी आमदार गीता जैन यांच्या अडचणी वाढणारा असल्याचे बोलले जात आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com