केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमास मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील सुमारे ८९,००० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी नशामुक्ती संदर्भात शपथ घेतली. अशी माहिती मा. बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग, मुंबई यांनी दिली. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने भारताला मादक आमली पदार्थ मुक्त बनवण्याच्या दृष्टीकोणातून नशामुक्त भारत अभियानाची सुरवात १५ ऑगस्ट, २०२० रोजी करण्यात आलेली होती. या उपक्रमाला ५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारचा मुख्य कार्यक्रम अमृतसर, पंजाब येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले.
नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे १८ नोव्हेबर, २०२५ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय कार्यक्रम मा. बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हेमू कलानी गर्ल्स कॉलेज, चेंबूर कॉलनी चेंबूर येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थित विद्यार्थी – विद्यार्थिनीनी नशामुक्तीबाबत शपथ घेतली. नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस अमोल मडामे यांनी नशामुक्तीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर / मुंबई शहर रविकिरण पाटील व हेमू कलानी गर्ल्स कॉलेजच्या सचिव श्रीम. रीटा वजराणी, संचालक शिवप्रसाद कुल्ची इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मुंबई विभागातील सामाजिक न्याय विभागातर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्फत संबधित जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे, शाळा महाविद्यालये, अनुदानित वसतिगृहे, निवासी शाळा या ठिकाणी १८ नोव्हेबर, २०२५ रोजी नशामुक्त अभियानाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमास सुमारे ८९,००० हून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झालेले होते.

0 टिप्पण्या