मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी अत्यंत सखोल तपास करून तपशीलवार अहवाल तयार केला. या तपासासाठी त्यांनी VJTI (Veermata Jijabai Technological Institute) सारख्या नामांकित तांत्रिक संस्थेच्या मदतीने घटनास्थळाचे बारकाईने विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष सादर केले. सध्या या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशा निर्णायक टप्प्यावर रेल्वे कर्मचारी संघटनांनी (CRMS) न्यायालयीन कारवाईत अडथळे निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना वेठीस धरणे, तसेच अतिगर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकांवर आंदोलन करणे, हे कायद्याने गुन्हा असून मानवी दृष्ट्याही अमानवीय आहे. या कृतींमुळे:हजारो प्रवासी अडकले, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे आणि रुग्णांचे हाल झाले,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर आज 6 नोव्हेंबर रोजी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईतील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळं काही प्रवासी रेल्वे रुळावरूनच चालत जात होते. या दम्यान, पाठीमागून आलेल्या लोकलने चार प्रवाशांना उडवले. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर-सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.1. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 141, 146, 147, 149 — सार्वजनिक सेवेत अडथळा आणणारा बेकायदेशीर जमाव दंडनीय आहे. 2. रेल्वे अधिनियम, 1989 चे कलम 174, 175 — रेल्वेचा प्रवास रोखणे किंवा हालचालीत अडथळा आणणे यासाठी तुरुंगवास व दंडाची तरतूद आहे. 3. कलम 150, रेल्वे अधिनियम — प्रवासी सुरक्षेला धोका निर्माण करणे “गंभीर अपघातास कारणीभूत” मानले जाते. 4. Essential Services Maintenance Act (ESMA) — आवश्यक सेवा (रेल्वे, रुग्णालय, वाहतूक) ठप्प करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. ज्या प्रवाशांच्या पैशांवर रेल्वे सेवा चालते, त्यांच्याच जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या अशा बेकायदेशीर कृत्यांचा मुंबई रेल्वे प्रवासी संघ तीव्र निषेध व्यक्त करतो. न्यायालयीन प्रक्रिया अडथळ्याविना सुरू राहावी, आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघाने केली आहे
मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेला दुर्दैवी लोकल अपघात रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेचे दुरुस्तीचे काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानेच झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पावसामुळे रुळाखालील खडी आणि माती वाहून गेल्याची कल्पना असतानाही रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मोठ्या पावसानंतर रेल्वे रुळाचे किरकोळ काम करून वेल्डिंग न केल्याने दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन दोन लोकल एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने प्रवासी घासले गेले होते, असा व्हिजेटीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रेल्वेच्या एसआयटीने विनंती केल्यानंतर व्हिजेटीआय या संस्थेने अहवाल दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा परिसरात अपघाताच्या आधी चार दिवस मोठा पाऊस पडल्याने रेल्वे रुळांच्या खालची खडी आणि माती वाहून गेली होती आणि जमीनही खचली होती, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या सगळ्याची माहिती असताना रेल्वे अधिकारी समर यादव आणि विशाल डोळस यांनी दुर्लक्ष करून क्वाशन ऑर्डर म्हणजे काम करण्याची ऑर्डर घेऊन सुध्दा काम न केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. रेल्वेच्या नियमानुसार काम सुरू असल्यास किंवा दुरुस्तीचे काम करावयाचे असल्यास रेल्वेचा वेग हा ताशी 69 किमी असायला हवा, पण असे असतानाही मुंब्रा स्थानकातील लोकलचा वेग ताशी 75 किमी होता, असेही तपासात समोर आले आहे.

0 टिप्पण्या