Top Post Ad

महापे येथील गोदामावर मोठी कारवाई; अवैध धान्य व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

ठाणे जिल्ह्यातील महापे येथील गोदामात अवैधरीत्या शिधावाटपाचे सरकारी धान्य खरेदी-विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्हा नियंत्रक कार्यालय व नागरी पुरवठा विभाग, मुंबई यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ₹4,69,923/- किमतीचा सरकारी तांदूळ जप्त करण्यात आला. ही कारवाई अवघ्या काही तासांच्या पाठपुराव्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली—जेणेकरून दोषींना पळ काढता येऊ नये.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, महापे MIDC परिसरातील एका गोदामात शिधावाटपाच्या तांदळाची बेकायदा विक्री सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. नियंत्रण अधिकारी नागरी पुरवठा, मुंबई यांनी तातडीने पथक तयार करून 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता धाड टाकली. तेथे सरकारी तांदळाचे मोठ्या प्रमाणावर पोते, अवैध खरेदी-विक्रीचे पुरावे, अनधिकृत वाहतुकीसाठी वापरला जाणारा टाटा एस वाहन (एमएच 43 एच 1765) असे सर्व आढळले. पथकाने वाहनचालक पिनू प्रसाद केरिया याला चौकशीअंती ताब्यात घेतले. केवळ 50% साठा गोदामातून काढला गेला असून उर्वरित 50% साठा ठाणे MIDC पोलीस स्टेशनमधून मिळाल्याच्या नोंदीही आढळल्या.

चौकशीअंती समजले की, आरोपी स्वस्त धान्य दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर धान्य गोळा करत, ते महापे व गोणपाडे येथील गोदामांमध्ये साठवत आणि त्याची खुले बाजारात बेकायदा विक्री करत होते. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत अशा प्रकारची बेकायदेशीर विक्री गंभीर गुन्हा आहे. ठाणे MIDC पोलीस ठाणे येथे वाहनचालक पिनू प्रसाद केरिया, गोदाममालक शिवलाल गहलोत, त्याचा सहकारी राजन सिंह या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सर्वांवर बेकायदेशीर धान्य खरेदी-विक्री तस्करीचे गुन्हे (गुन्हा क्रमांक : 0444/2025 दिनांक : 21.11.2025) दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रकांत डांगे (भा.प्र.से. नियंत्रक नागरी पुरवठा, मुंबई  ) यांनी सांगितले की, “सरकारी शिधावाटपाचे धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गरीब जनतेच्या अन्नावर डल्ला टाकणाऱ्यांविरुद्ध कडकात कडक कारवाई केली जाईल. अशा कारवाया नियमितपणे सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com