Top Post Ad

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

*• दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार*

*• दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन*

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. तर, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना सादर करता येतील. मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

 मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ‘बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, सभागृह, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई’ येथे ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर, शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तर, शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर ते गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, सदर आरक्षणाच्या अनुषंगाने, हरकती व सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक प्रभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता आणि इतर तपशील बृहन्मुंबई महागरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCGE2025 या लिंकवर उपलब्ध आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com