Top Post Ad

स्वस्त कच्चे तेल खरेदीचा फायदा सरकारला नाही तर खासगी कंपन्यांना

रशियाकडून भारताने खरेदी केलेल्या स्वस्त कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) मुद्द्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.  भारताने रशियाकडून जे स्वस्त कच्चे तेल खरेदी केले आहे, त्याचा फायदा भारत सरकारला न होता, उलट भारतातील खासगी कंपन्या रिलायन्स ऑईल आणि नायरा कंपनीला होत आहे,  असा थेट आरोप त्यांनी पटना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

 बिहार निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, भारत सरकारचे हे धोरण खासगी कंपन्यांसाठी आहे. जर उद्या या खासगी कंपन्या इतर देशांतील कंपन्यांसोबत बाजारपेठेत उतरल्या, तर याचा फटका त्या देशाला बसेल. यामुळेच त्यांनी भारतावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे, जग म्हणत आहे की, ही आर्थिक व्यवस्था (इकॉनॉमिक सिस्टीम) योग्य नाही. जर याचा फायदा भारत सरकारला झाला असता आणि देशातील डिझेल, पेट्रोलचे दर कमी झाले असते, तर हे धोरण लोकांसाठी आहे, असे मानले गेले असते,

तसेच यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर भाष्य केले. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा न मिळाल्याच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की,  ऑपरेशन सिंदूरनंतर कोणताही मोठा देश आमच्यासोबत उभा राहिला नाही. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, तुर्की, चीन आणि रशियासुद्धा पाकिस्तानसोबत उभे राहिले.

 आरएसएस-भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, पेरियार स्वामी यांना मानणारे जे लोक आहेत, त्यांना आमचे आवाहन आहे की, जर देशाला वाचवायचे असेल, तर या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू (एनडीए) युतीविरोधात आपले मत द्या,  असे स्पष्ट आवाहनही त्यांनी यावेळी केले.  कोणत्या पक्षाला मत द्यायचे,  कोणाला मत द्यायचे, हे आम्ही सांगणार नाही, पण एनडीए युतीविरोधात आपले मत देऊन देशाला वाचवायचे आहे  अशी भूमिका त्यांनी मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com