:पाली भाषा सर्व भाषांची जननी आहे या भाषेत भारताच्या सुरुवातीच्या काळातील विश्लेषण आलेले आहेत म्हणून पाली भाषेच्या अध्ययनाने भारताच्या इतिहासामध्ये असणाऱ्या सुवर्ण काळाला नव्याने मांडता येऊ शकते असे प्रतिपादन प्रज्ञा बुद्ध विहार समितीचे उपाध्यक्ष किशोर अघम यांनी केले ते पाली भाषा परीक्षा मंडळांनी पाली भाषा परीक्षा घेतली त्यावेळी बोलत होते
स्थानिक नालंदा नगर मधील प्रज्ञा बुद्ध विहारांमध्ये पाली भाषा परीक्षा घेण्यात आली बुद्ध विहार समन्वय समिती नागपूरच्या वतीने गठीत पाली भाषा परीक्षा मंडळाने संपूर्ण महाराष्ट्रभर पाली भाषा परीक्षा आयोजित करण्यात केली होती या परीक्षेचे नेर येथील नियंत्रक म्हणून किशोर अघम होते याप्रसंगी त्यांनी बुद्धकालीन इतिहास आणि अशोक कालीन इतिहास याची मांडणी पाली भाषेमध्ये आहे आणि हा अत्यंत सुवर्णकाळ होता या काळाची माहिती पाली भाषेच्या अध्ययनाने नव्यानेजगासमोर मांडता येईल असे विवेचन किशोर अघम यांनी केले
परीक्षेच्या यशस्वीतेसाठी नेर येथील पाली भाषा परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. शरद मोरे यशोधरा तलवारे अरुणा इंगोले शशिकला इंगोले वर्षा अघम शारदा अघम रंजना रामटेके माला वासनिक अलका ठमके प्रीती पानतावणे मैत्री पानतावणे वनिता मोरे विद्या चौधरी आदींनी प्रयत्न केले

0 टिप्पण्या