Top Post Ad

२१ नोव्हेंबरचा 'हुतात्मा-दिन'च का निवडला गेला...?

भांडवलदारवर्गाकडून 'मालामाल' होणारी व थेट त्यांची 'दलाल' असलेली, भाजप-संघीय 'गुजराथी-लाॅबी' व एकूणच त्यांची NDA आघाडी... "४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)" लादण्यासाठी २१ नोव्हेंबर हाच दिवस का निवडते...?

_'कंत्राटी-कामगार पद्धती'तल्या गुलामगिरी व नव-अस्पृश्यतेनं महाराष्ट्रातला मराठी-कामगार ग्रासलेला असतानाच...'मराठी-मस्तका'वर अंतिम प्रहार करण्यासाठी व त्यांचं जितंजागतं 'माणूसपण' कायमचं संपवण्यासाठीच ("The last nail in the coffin")..."४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)" लादली जातेय, हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे... *'गोदी-मिडीया'तल्या भूलथापांवर अजिबात फसू नका...त्यांचे सगळेच 'मालक' गुजराथी-भांडवलदार आहेत!*_

_...मग, त्या लादण्यासाठी *२१ नोव्हेंबरचा 'हुतात्मा-दिन'च का निवडला जातो;* तर, तमाम मराठीजनांना, अत्यंत तीव्र स्वरुपाच्या मानसिक यातना देण्यासाठीच, हे आम्ही कधि समजून घेणार? यादिवशीच, "मुंबईसह संयुक्त-महाराष्ट्र" आंदोलन पेटलं व त्या आंदोलनातील १०६ हुतात्म्यांनीच आपल्या बलिदानातून महाराष्ट्राला, त्याच्या हक्काची मुंबई, मोरारजींच्या 'गुजराथ'कडून हिसकावून मिळवून दिली होती. लक्षात घ्या, त्यापैकी ८५ हुतात्मे, हे 'गिरणी-कामगार' होते...त्या सगळ्या घटनाक्रमाचाच *'खुन्नस' काढायचा म्हणूनच या कामगारविरोधी कारस्थानी कृत्यासाठी 'हुतात्मा-दिन' निवडला गेला!*_

_मराठी-माणूस, म्हणजे मुख्यतः 'मराठी-कामगार'च! तेव्हा, या *"४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)" जर, उखडून फेकून देण्याबाबत, जो 'मराठी-नेता' अभिवचन देणार नाही (प्रत्यक्षात, ते 'ब्र' तरी काढतायत का, ते पाहूया)...तो 'मराठी-नेता', हा नेता नसून राजकारणातला 'अभिनेता' आहे,* हे खुशाल समजा!_

_*"४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)" आता लादल्या गेल्याने काय काय उत्पात होतील, याची अगदी थोडक्यात मांडणी करुया....*_

** कायम नोकऱ्या, आता कायमच्या संपणार; म्हणजे, *नोकरीत 'कायम' असण्यानं आयुष्यात जे थोडंबहुत स्थैर्य व सुरक्षितता होती, ती कायमची गेलीच समजा...* तेव्हा, लग्न करुन *संसार थाटणं, ही एक 'लक्झरी' बाब* बनेल, तेव्हा, विवाहवेदीवर चढण्यापूर्वीच एकदम सावधान आणि अगदी हिंमत करुन लग्न केलंतच...तर, *मुलं जन्माला घालताना 'डबल सावधान';* थोडक्यात, 'कुटुंब-नियोजना'चा भाजप-संघीय सरकारने निवडलेला एक मार्गच...आणि, यांचे भोंदू संत-महंत आणि यांचे ते मोहन भागवत "तीनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालायला सांगतायत", मोठी अजबच गोष्ट आहे! स्वतः 'अविवाहित' असलेल्या 'त्यांना' विचारा, ही तुमच्या म्हणण्यानुसार *मुसलमानांशी स्पर्धा करत, आम्ही पैदा केलेली ढीगभर पोरं...पोसायची कशी आणि त्यांना वाढवायची तरी कशी?*

** कायम नोकऱ्यांसोबतच काॅरपोरेटीय क्षेत्रातील 'कामगार-चळवळ' हळूहळू संपणार...त्यातून संपासारखे संघर्ष, अगदी 'अपवाद' म्हणूनच, क्वचित कधि यशस्वी ठरणार

** 'गिग-वर्कर्स्' (Gig-Workers) वगैरे गोंडस संज्ञा वापरणारे, हे *भाजप-संघीय भांडवलदार लोक प्रत्यक्षात, सगळ्याच कामगारांना ''पिग-वर्कर्स्" (Pig-Workers) बनवणार*

** नोकरीचा कालावधी अनिश्चित म्हणजेच, *नोकरी टिकते की, नाही याची टांगती तलवार...* त्यात भरीसभर म्हणून पगारासंदर्भात, कामगार-संघटनांच्या मोठ्या पगार व बोनसवाढीच्या संघटित-करारांसोबत (जे आता होणं, फारच कर्मकठीण) *"वैयक्तिक-करारांचं कारस्थान"* (सुरुवातीला त्यासाठी 'लालूच' दाखवतीलच, जशी ती मागे पत्रकारांना दाखवली गेली होती) रचलेले असल्यामुळे, काॅर्पोरेटीय क्षेत्रात सगळीकडे, हे *नवे  ''पिग-वर्कर्स्" (Pig-Workers)* कंपनीत प्रचंड दहशतीत वावरताना दिसतील व व्यवस्थापनाने (Management) फेकलेल्या पगाराच्या तुकड्यांवर... उकिरड्यावर चरणाऱ्या डुकरांसारखेच आपल्या 'थोटक्या' शेपट्या हलवत 'चरताना' दिसतील

** 'हायर अँड फायर' धोरण राबवायची एवढीच हौस आहे; तर, *पाश्चात्य देशातलं वेतन, तिथली सामाजिक-सुरक्षा आणि 'अनुचित कामगार प्रथां'साठी (Unfair Labour Practices) व्यवस्थापकांना ३ वर्षांच्या तुरुंगवासासह व्यक्तिगतरित्या फार मोठ्या आर्थिक-दंडाची तरतूदी आणाच...शिवाय, सोबत तिथल्याप्रमाणे कंपनीलाही जबरदस्त भुर्दंड भरायला लावा;* यामुळे, कोण कुठला भांडवलदार, भारतातून (मुख्य म्हणजे, महाराष्ट्रातून) 'भांडवल' काढून पळून जाईल, ही फालतू व भंकस भिती घालणं, साफ बंद करा...असले 'भगोडे व लुच्चे-लुटारु भांडवलदार' पळून गेलेलेच बरे, आम्ही शोषित-अपमानित काॅर्पोरेटीय जीणं जगण्यापेक्षा, प्रसंगी शेती करुन झाडपाला खाऊन जगू!

** 'कंत्राटी-कामगार पद्धती'विरुद्ध लढण्यासाठी जे काही उरलेसुरले (खरंतरं, अगदीच बोथट स्वरुपाचे व वर्षानुवर्ष रेंगाळणारे) कायदेशीर वा न्यायालयीन मार्ग, आता जवळपास पूर्ण बंद होणार 

** ले-ऑफ (कामबंदी), कामगार-कपात आणि कंपनी बंद केली जाणं...अगदीच सुलभ होणार. याकामी लागणारी १०० हून अधिक कामगारांची अट काढून टाकून ती ३०० वर नेल्यामुळे ७०% कामगार-कर्मचारी बाधित होणार

** क्षुद्र वा क्षुल्लक कारणांसाठी 'कामगार-संघटनां'ची नोंदणी रद्द केली जाण्याच्या भयंकर तरतुदीमुळे *'कामगार-चळवळ', ही 'कामगार' नावाच्या गांडुळांची 'वळवळ'* बनवण्याचा शकुनी-डावपेच

*...चला तर, 'हिंदुत्वा'च्या नावाखाली, या ढोंगी-बदमाष हिंदुत्ववाद्यांना...याहीपुढे, असंच 'मतदान' करुया आणि आपली उरलीसुरली इभ्रत व जगण्याची पत, गाव-शहरांच्या वेशीबाहेर टांगूया...त्यांच्या लेखी, आपली तेवढीच लायकी आहे आणि ते त्यांचं म्हणणं योग्यच आहे, हे 'कामगार' म्हणून आपण पुन्हा पुन्हा सिद्ध करत राहूया...हाच, आपल्याला कळलेला-उमगलेला 'कामगारधर्म' होय!*

  • .राजन राजे
     (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com