शेतकऱ्यांना आवश्यकता आहे आर्थिक प्रशिक्षणाची आर्थिक शिक्षणाची व आपली आर्थिक परिस्थिती कशी चांगली होईल याचं ज्ञान मिळण्यात ज्ञान असणं गरजेचं आहे. गुजरात पंजाब हरियाणा येथील शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून श्री धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्सचे शेअर्स प्रत्येक गुजराती माणसाला दिलेल्या आहेत त्याची किंमत आज पंधरा हजार रुपये झाली. गुजराती सिंधी मारवाडी पंजाबी ते शेतीसुद्धा करतात व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांची खाते पोस्टमध्ये बँकांमध्ये सहकारी बँकांमध्ये पतपेढीमध्ये. या सर्व संस्था सर्वसाधारण माणसांचे शेतकऱ्यांचे पैसे शेअर मार्केटमध्ये लावतात आणि त्यांचे पैसे स्वतः दुप्पट तिप्पट करून मजा मारतात. शेतकऱ्याला आठ टक्के चेवर कोणती संस्था व्याज देत नाही त्यामध्ये सुद्धा टॅक्स संपला जातो. मी शेतकऱ्यांच्या मुलींकरता दर महिन्याला शंभर रुपये म्युच्युअल फंड जे खाते उघडून टाकण्याची योजना आणली कोणीही पुढे येत नाही. अनेकांना पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का बँक खात्याला ते मला द्या मी त्यामध्ये दर महिन्याला शंभर रुपये एस आय पी बारा महिने करता करतो आणि म्युच्युअल फंडाचे झाड तुमच्या घरामध्ये लावतो.
महापुरामध्ये व पावसामुळे शेतीचे पीक हातातून गेलं शेतमालाला भाव नाही हे चक्र मी अनेक दशकापासून पाहतो. शेतकरी शेतमजूर यांना व्यवसायिक डॉक्टरांपासून वाचवण्याकरता महात्मा फुले मोफत दवाखाना पातुर येथे सुरू गेला. कमीत कमी शेतकरी कंबर दुखणे गुडघा दुखला मान दुखली तर अकोल्याला जाऊन एक्स-रे काढा एम आर आय काढा ऑपरेशन करा भरपूर औषध खा. या खर्चातून वाचवण्याकरता मी दर महिन्याला 30 ते 40 हजार रुपये मोफत औषध वाटप करून खर्च करतो. मी आणि माझ्यासारखे अनेक डॉक्टर शेतकऱ्यांना मदत करण्याकरता उभे आहेत परंतु शेतकरी मदत घेण्याकरता तयार नाही. आज आर्थिक प्रशिक्षण जर तुम्हाला नाही तुमच्या खातं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही तर तुम्हाला गुंतवणूक करता येत नाही तुमची प्रगती होऊच शकत नाही. संपूर्ण जग शेअर मार्केट मध्ये पैसे टाकते चायना जपान अमेरिका व इतर अनेक देश भारतामध्ये पैसे टाकतात दुप्पट तिप्पट करतात आणि निघून जातात.
अडाणी अंबानी टाटा बिर्ला नारायण मूर्ती अशा शेअर मार्केटमध्ये दहा हजार कंपन्या आहेत याचे शेतकरी भाग भागीदार होऊ शकता. कोणीतरी मला मार्ग सुचवा नाव की काय करावं शेतकऱ्यांसाठी की त्यांनी मला म्युच्युअल फंड करतात आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचे खाते द्यावे त्यामध्ये मी माझे स्वतःचे दर महिन्याला शंभर शंभर रुपये बारा महिने टाकतो व बारा महिन्यानंतर त्यांनी पैसे टाकावे नाही टाकले तर ते पैसे पडून राहतील दहा वर्षानंतर ते पैसे तीन ते चार पट होतील. एक दोन शेतकऱ्यांनी म्युच्युअल फंड मध्ये टाकण्याची विचारणा केली व विचारणा करतानाच एक प्रश्न मोठा की ते कधी पण काढता येतात ना. टाकण्याच्या आधीच काढण्याची भाषा. सोन्याचा भाव गगनाला भिडला कोणतेही शिक्षण कोचिंग क्लासेस होत नाही शासकीय रुग्णालयामध्ये उपचार होत नाहीत बिमार पडले म्हणजे खाजगी डॉक्टर लुटतात.
शेतकरी नेत्यांना मला जागा दाखवा मला जागा द्या मी शेतकऱ्यांकरता मोफत रुग्णालय सुरू करतो असे सुचविले परंतु उपयोग झाला नाही. माननीय शरद पवार साहेब अकोल्याला येऊन गेले शेतकऱ्यांशी संवाद उपकार सिनेमांमध्ये एक डायलॉग आहे राशन पर भाषण होत आहे पर भाषण पर राशन नही होता. सन्माननीय पवार साहेब 84 वर्षाचे वय झालं ते विचारे काय मार्गदर्शन करतील. प्रगती करायची असेल तर आर्थिक गुंतवणूक आर्थिक प्रशिक्षण आर्थिक तज्ज्ञांचं मार्गदर्शन. पंतप्रधान मोदी गुजराती आहेत शेअर मार्केट कुठे नेऊन ठेवलं त्यांनी गुजरातमध्ये गुजराती व्यापारांची दरवर्षी संमेलन होतं. संपूर्ण जगातील गुजराती व्यावसायिक आमदाबाद मध्ये सुरत मध्ये गोळा होतात व गुजराती समाजाला कसे समृद्ध करता येईल याचा विचार करतात. माझी हात जोडून विनंती आहे की कोणीतरी मला शेतकऱ्यांचं खातं तो कोणत्याही जाती धर्माचा असो म्युच्युअल फंड मध्ये त्याचे मुलाचे नावाने मुलीचे नावाने खाते उघडण्याकरता मदत करावी ही नम्र विनंती
- डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे
- अस्थिरोग तज्ञ वर्ग एक ठाणे
0 टिप्पण्या