वंचित बहुजन आघाडीने RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना संपर्क केला होता मात्र, नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिसांना दोन स्पष्ट पर्याय दिले आहेत,
औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे आरएसएसची नोंदणी सुरू होती. याला विरोध करण्याचे काम वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते विजय वाहूळ यांनी केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अजामीनपात्र आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आरएसएसच्या बेकायदेशीर नोंदणी अभियानाला विरोध केल्यामुळे राहुल मकासरे आणि विजय वाहूळ यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची ठाम मागणी केली. आजपर्यंत आरएसएसला बाळासाहेब आंबेडकर यांनी तीव्र विरोध केला आहे. जर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेतले नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल, - अमित भुईगळ

0 टिप्पण्या