Top Post Ad

कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT) तर्फे बालसंरक्षण विषयावर माध्यम संवेदनशीलता कार्यशाळेचे आयोजन

 कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT) यांनी जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि महिला व बालविकास विभागयांच्या सहकायनि मुंबई प्रेस क्लब येथे "बालसंरक्षण विषयावर माध्यम संवेदनशीलता कार्यशाळा" यशस्वीपणे आयोजित केली.या कार्यशाळेत शासकीय प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था (NGO) प्रतिनिधी आणि माध्यम क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते. कार्यशाळेचा उद्देश पत्रकारांना बालसंरक्षणाच्या प्रोत्साहनात माध्यमांची निर्णायक भूमिका यावर संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. या सत्रामध्ये तज्ज्ञांचे सादरीकरण, वास्तव जीवनातील प्रकरणांवरील चर्चा आणि मुलांशी संबंधित विषयांवर नैतिक व संवेदनशील अहवाल देण्याच्या सामूहिक बांधिलकीचा समावेश होता.

 गत तीन दशकांपासून CCDT महाराष्ट्रातील वंचित समुदायांसोबत सातत्याने कार्य करत आहे आणि बालहक्क व संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आपल्या विविध उपक्रमांद्वारे एक लाखाहून अधिक मुलांपर्यंत पोहोचलेल्या CCDT ने माध्यमांद्वारे बालहक्क, अत्याचार आणि शोषणाशी संबंधित अहवाल देताना नैतिक, कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कार्यशाळेत बोलताना सी. सुकन्या पोद्दार, CCDT च्या मॅनेजिंग ट्रस्टी म्हणाल्या, "आमच्या विस्तृत अनुभवावरून आम्हाला असे वाटते की समुदाय आणि माध्यमांना बालविषयक अहवाल देताना नैतिक, कायदेशीर आणि सामाजिक पैलू समजावून देणे ही आमची जबाबदारी आहे. माध्यमे लोकमत घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि प्रत्येक मुलासाठी अधिक सुरक्षित वातावरण तयार करण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरू शकते."

दीपक त्रिपाठी, चाइल्ड प्रोटेक्शन लीड, यांनी ही कार्यशाळा घेतली आणि बालविषयक मुद्द्यांवरील संवेदनशील, अचूक आणि जबाबदार वृत्तांकनाची गरज अधोरेखित केली ज्यामुळे प्रत्येक अहवाल मुलांच्या हक्क, सन्मान आणि सर्वोत्तम हिताचे रक्षण करतो. CCDT ने माध्यम प्रतिनिधींनी दाखवलेल्या उत्साही सहभागाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या मौल्यवान सूचना व दृष्टिकोनाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले, तसेच माध्यम क्षेत्रात बालसंरक्षणाच्या कथनांना अधिक बळकटी देण्यासाठी सामूहिक बांधिलकी पुनस्र्थापित केली.

  • 42, Ground Floor, Chapel Road, Bandra (West), Mumbai-400050, India
  • Phone: +91 8657898537 | Email: contact@ccdtrust.org | Website: www.ccdtrust.org
  • Registered Under Maharashtra Public Trust Act 1950 No. E12988. 
  • Donations are exempted under section 80G of the Income Tax Act 196

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com