Top Post Ad

दीपोत्सव साजरा करताना.....

दीपोत्सव साजरा करताना  आपल्या अवतीभवतीच्या पर्यावरणाचाही सजगपणे विचार करावा. तसेच दिवाळीत फटावे उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. यासोबतच फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही, याबाबत  दक्ष रहावे, . दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, 

प्रकाशाचा सण, सणांचा राजा, दीपोत्सव अशी ओळख असणारा दिवाळीचा सण  अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. तसेच दिवे लावताना व फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विशेष करुन लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, काही वेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घ्यावी, 

  • *फटाके फोडताना/उडवितांना घ्यावयाची काळजी*
  • १. सुती कपडे परिधान करावेत.
  • २. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत. मुले फटाके फोडतांना मोठ्यांनी सोबत रहावे.
  • ३. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.
  • ४. फटाके फोडताना / उडवताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व कोणाला भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
  • ५. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजीचा वापर करावा.


*फटाके फोडताना/उडविताना पुढील बाबी टाळाव्यात*
१. इमारतीत व जिन्यावर, तसेच टेरेसवर फटाके फोडू नयेत.
२. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.
३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
५. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनांजवळ, वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
६. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोशणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार (ओव्हरलोड) होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

. दीपावलीचा सण हा सर्वांसाठी आनंददायी, सुरक्षित व पर्यावरणपूरकरितीने साजरा करणे, याबाबत सामाजिक हिताचा देखील विचार करणे आवश्यक आहे, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com