डॉ. विनोद सा.आर्य यांच्या 'धुळीत उमटलेल्या पाऊल खुणा' पुस्तकाचे प्रकाशन
तथागत बुद्धांकडे पाहण्याचे दोन प्रकार आढळतात. एक म्हणजे कथांमधील बुद्ध आणि दुसरे बुद्ध म्हणजे पाली त्रिपिटकात वर्णन केलेले बुद्ध. त्यामध्ये बुद्धाच्या उपदेशांचे प्राचीन लेखी अभिलेख आढळतात. या दोघांमध्ये मोठा फरक आहे. कथांमधील बुद्ध रंगीबेरंगी, मनोवेधक आणि कधी कधी अलौकिक स्वरूपाचा असतो; तर इतिहासातील तिपिटकातील बुद्ध अधिक वास्तववादी, आध्यात्मिक दृष्ट्या अद्वितीय परंतु मानवी स्वरूपाचा आहे. आणि असा बुद्ध आपल्याला मुळ तिपिटकातून दिसून येतो असे प्रतिपादन भन्ते श्रावस्ती धम्मिका यांनी येथे केले.
गोरेगाव ( पश्चिम ) येथे भन्ते श्रावस्ती धम्मिका ( ऑस्ट्रेलिया ) लिखित 'फूटप्रिंट इन द डस्ट' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद 'धुळीत उमटलेल्या पाऊल खुणा' हे डॉ. विनोद सा. आर्य यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा व धम्मदूत पुरस्कार सोहळा येथील नागरी निवारा परिषद संकल्प संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एल. थुल, आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर डॉ. रत्नाकर अहिरे, मुंबई विद्यापीठाचे प्रा. राहुल राव, के. जे. सोमय्या बौद्ध अध्ययन केंद्राचे प्रा.गौतम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच अभिसंबोधी इन्स्टिट्युट आँफ पालि एण्ड बुद्धिस्ट स्टडिज् व संबोधि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त उपक्रमातून भन्ते श्रावस्ती धम्मिका यांचा 'धम्मदूत' पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
यावेळी माजी न्यायाधीश सी. एल. थुल यांनी पुस्तकाबाबत विचार मांडले. आजच्या पिढीसाठी या पुस्तकातून आलेले धक्कादायक संदर्भ व त्याची उपयोगीता यांची विस्तृत चर्चा केली. रत्नाकर अहिरे यांनी आपल्या विशेष भाषण शैलीत पुस्तकाची रूपरेखा मांडून श्रोत्यांचे मन जिंकली.
या कार्यक्रमात प्रा. गौतम मोरे यांनी पालि भाषेच्या ज्ञानाचे महत्व व आजच्या पिढीसाठी पाली भाषेच्या संशोधनासाठी 'अभिसम्बोधि' व संबोधि' चॅरिटेबल ट्रस्ट यासारख्या संस्थेकडून घेत असलेल्या मोफत पालि प्रशिक्षणाची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संचालन अँड. प्रकाश वीर यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष किशोरकुमार सुर्यवंशी, सचिव दामोदर गायकवाड, प्रशांत खाकसे, अनिल डबले, राजेश जेटके, मधुकर सोणवणे, अरुण पवार, सचिन रुके, शर्मिला कापसे, उज्वला वीर आदी पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या