मुंबई बोरीवली (पूर्व) येथील देवीपाडा परिसरात महाकाली नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात अमोघ एंटरप्रायझेस, जीएसपी डेव्हलपर्स आणि राईट बिल्टेक प्रा.लि. या कंपन्यांमार्फत नागरिकांना आकर्षक दरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम न करता मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करून तब्बल २०० गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप पीडितांच्या वतीने करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती देण्याकरिता पिडीत नागरिकांच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अॅड. रूपेश जयस्वाल यांनी याबाबत प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली.
ठाणे आणि मुंबईतील काही गुंतवणूकदारांकडून तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. यासाठी सुरुवातीला टोकन रक्कम घेऊन हप्त्यांद्वारे पैसे जमा करण्यात आले. गुंतवणूकदारांना प्रकल्पाचे आकर्षक ब्रोशर दाखवून स्वप्नवत चित्र रंगविण्यात आले होते. मात्र, भागीदारांतील वाद, खटले आणि कंपन्यांतील बदल या कारणांमुळे प्रकल्प रखडला. फसवणुकीचे प्रमाण केवळ काही लोकांपुरते मर्यादित नसून, तब्बल २०० हून अधिक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले आहे. यासाठी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१(२), ३१६, ३१८, ३३६, ३४०, ३१४, ३५१, २२९ व १९८ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. एनसीएलटीने १६ जानेवारी २०२५ रोजी ‘राईट बिल्टेक प्रा.लि.’ ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी एस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडला नियुक्त केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले दावे मांडण्यासाठी कायदेशीर पावले उचलली आहेत. याप्रकरणी अमोघ एंटरप्रायझेस व जीएसपी डेव्हलपर्सचे प्रतिनिधींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.मेसर्स अमोघ एंटरप्रायजेस, नंतर निर्माण डेव्हलपर्स, नंतर जीएसपी डेव्हलपर्स आणि नंतर राईट बिल्टेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी सदर प्रकल्प विकसित करण्याचे मान्य केले. सध्या हा प्रकल्प मेसर्स एस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड द्वारे विकसित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र मेसर्स अमोघ एंटरप्रायजेसअनेक गुंतवणूकदार होते ज्यांच्याकडून त्यांच्या नावावर फ्लॅट बुक करण्याच्या बहाण्याने मोठी रक्कम घेण्यात आली होती. त्यांच्याकडून मोठी रक्कम मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला होता. सामंजस्य करारांची प्रत तसेच वेळोवेळी त्यांना देण्यात आलेल्या पावत्या हाच या सुमारे २५ सदस्यांकडे पुरावा म्हणून आहे.तसेच या प्रकल्पांतर्गत इतर सुमारे २०० इतर फ्लॅट मालकांचे पैसे फसवले गेले आहेत. याप्रकरणी आधीच मुंबईतील कस्तुरबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि सध्या आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी प्रकरण आर्थिक दंड वसुली विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. ASPECT GLOBAL VENTURE PVT. LTD ला RITE BUILTEC PVT. LTD नावाची कंपनी ताब्यात घेण्यासाठी दिनांक १६.१.२०२५ च्या NCLT आदेशाद्वारे नियुक्त करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांसमोर त्यांचे दावे मांडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे. मेसर्स अमोघ एंटरप्रायझेस आणि जीएसपी डेव्हलपर्सच्या प्रतिनिधींनी अटकपूर्व जामिनासाठी माननीय सत्र न्यायालयात अर्ज केला आहे जो पोस्ट केला आहे.

0 टिप्पण्या