Top Post Ad

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला अर्पण, ‘मुंबई वन’या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचा शुभारंभ झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे भारतातील राजदूत ओनू केईची, वन मंत्री गणेश नाईक, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील पाटील, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मंदाताई म्हात्रे, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबई विमानतळाची प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. शिवकर बापूजी तळपदे यांनी उडविलेल्या देशातील पहिल्या विमानाची प्रतिकृती देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री यांचे स्वागत केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती असलेले मानचिन्ह देऊन गौतम अदानी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टच स्क्रीन द्वारे डिजिटल तोरणाने करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टर्मिनल इमारतीमधील सुविधांसह विमानतळाच्या त्रिमितीय रचनेची पाहणी केली.यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू,  केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात  एक टक्क्यांची वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्नरूपात होते, गेली दहा वर्षे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ते आज वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असली, तरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘प्रगती’ उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला. हे विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. विमानतळाबरोबरच अटल सेतू, 40 किमी लांबीची भूमिगत मेट्रो ही प्रकल्पही जलद गतीने पूर्ण झाले आहेत. या मेट्रोच्या निर्मितीत जपान सरकार आणि जायका संस्थेचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विविध विमाने टेक-ऑफ आणि लँडिंग करतात, पण भारताला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली प्रगती आणि विकास घेऊन आले  आहे. नवी मुंबई हे केवळ विमानतळ नाही, तर नवीन भारतावरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून फक्त विमानांचे उड्डाण होणार नाही, तर एक मजबूत आणि आत्मनिर्भर भारत उभारला जाणार आहे. 21 व्या शतकात मोदीजींनी देशाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा देशात केवळ 74 विमानतळ होते. गेल्या दहा वर्षांत ही संख्या दुप्पट होऊन 150 वर पोहोचली असून 2030 पर्यंत ती 220 करण्याचा संकल्प प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज लोकार्पण झालेली मेट्रो-3 मार्गिका म्हणजे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे. ‘कुलाबा-बांद्रा-सीप्झ’ हा मार्ग सुरु झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे. मेट्रो लाईन-3 च्या ‘फेज 2-बी’च्या उद्घाटनाने मुंबईला नवी गती मिळणार आहे. ही भुयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही, तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबरीने वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यकत् केला. 

नवी मुंबई ही नवीन आशा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. जागतिक दर्जाच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती मिळाली आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी केले.2014 नंतर मुंबई विमानतळावर प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या 190 वरून 260 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ नव्या संधींचे दार उघडणार आहे. अंदाजे ₹100 अब्ज गुंतवणुकीत उभारण्यात आलेले हे विमानतळ 30,000 एकर क्षेत्रात पसरले असून सुमारे 2 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल. सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे हे एक आदर्श उदाहरण ठरेल, असे त्यांनी सांगितले.

देशातील सर्वोत्कृष्ट आणि कार्यक्षम विमान सेवा महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बहुप्रतिक्षित आणि महत्वाकांक्षी प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देईल. अशा प्रकल्पांमुळे आगामी काळात सामान्य जनतेच्या हवाई प्रवासात मोठी वाढ होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नमूद केले. केंद्र सरकारच्या ठोस धोरणांमुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होत असून, हे देशाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com