Top Post Ad

चोर चोर मावसभाऊ!

 चोर चोर मावसभाऊ! अजित पवार यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला.आपल्या जळगावच्या भाषेत चोरी केली.ती कागदपत्रे बैलगाडीत भरून फडणवीस आणि अहिरावण महिरावण यांनी चितळे समीतीला सादर केले.चितळे समीतीने सर्व कागदपत्रे पाहून अहवाल लिहीला कि,हो!सत्तर हजार कोटीचा घोटाळा (चोरी) केला आहे.यापैकी आठाणा वसुली केला नाही. उलट यातून आपला वाटा घेऊन फडणवीस यांनी अजित पवार यांना क्लीन चिट दिली.जा बेटा , पुन्हा चोरी कर .आम्ही तुला अर्थखाते देतो.तिजोरीतून काय चोरायचे ते तू ठरव आणि आम्हाला आमचा वाटा दे.पकडला गेला तर आम्ही बसलो आहोत क्लीन चीट द्यायला.

आता हेच सिंचन खाते भाजप सरकार कडे आले आहे.तर येथे तशीच चोरी चालू आहे. जशी अजित पवार करीत होते.आठ आणा ची कोंबडी आणि बारा आणाचा मसाला.एस्टीमेट पेक्षा डबल ,टिबल निधी देऊन अर्धा माल गडप करणे.एक टेंडर तर कोर्टाने रद्द केले.विरोधी पक्षाने का आक्षेप घेतला नाही?मोठे रहस्य आहे.
अमळनेर तालुक्यातील सात्री गावाचे पुनर्वसन वर वेगळा खर्च आणि जे गांव उजाड होणार त्यावर वेगळा खर्च.तब्बल ३ कोटी ८८ लाखावर डल्ला मारला आहे.इतक्या रकमेतून तर १७५+३३ कुटुंबांना सिमेंट ची घरे बांधून देता येतील.पण नाही बांधायचे.पेशंट ला मरू द्यायचे नाही आणि तरू द्यायचे नाही.बस्स! आयसीयू मधे झोपवून बील काढायचे.पेशंट चूप, नातेवाईक खुष आणि डॉक्टर मालामाल.म्हणून सात्री गावाचे पुनर्वसन २००३ ते २०२५ पर्यंत लटकावून ठेवले आहे.येथे आमदार,त्याचे पंटर, अधिकारी आणि मंत्री चंगाचगा होत आहेत.पैसा हजम आणि निधी खतम.
आश्चर्य हे कि अमळनेर तालुक्यातील कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना नेते मूग गिळून बसले आहेत.विचारले तर हळूच सांगतात,हे पुनर्वसन प्रलंबित राहिले तर आम्ही पण हाच उपक्रम राबवणार आहोत. राजकारणात पैसा लागतो.सैन्य पोटावर चालते.गडकरींच्या भाषेत,आमची दोन कामे पवार साहेब करतात.त्यांची दोन कामे आम्ही करतो.कमाल आहे! चोर चोर मावस भाऊ! हे नरसिंह राव यांचे धोरण आहे.खाऊजा. खा.ऊठ आणि जा. प्रस्थापित राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना, नेत्यांना, नवनिर्वाचित आमदार खासदारांना कॅम्प घेऊन भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण देतात.ते पारंगत झाले कि निधी चोरीच्या मोहिमेवर पाठवतात.ती मोहिम अमळनेर तालुक्यातील सात्री येथे राबवली जात आहे.
.. शिवराम पाटील
जळगाव जिल्हा अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष
२४/१०/२०२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com