Top Post Ad

प्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या देणगीतून केईएम रूग्णालयासाठी एनआयसीयू व्हेंटिलेटर

 आपल्या समाजामध्ये देणगीदार आणि चांगल्या कार्यासाठी देणगी देणाऱयांची संख्या कमी नाही. पण ज्यावेळी समाजमान्य व्यक्ती लोकोपयोगी कार्यामध्ये सहभागी होते, त्यावेळी देणगीसोबतच त्यांचा सहभाग आणि सामाजिक योगदान तितकेच मोलाचे असते.  मुंबई महानगरपालिका संचालित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालयाला नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी (एनआयसीयू) जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) देणगी स्वरूपात दिल्याबाबत पद्मश्री डॉ. (श्रीमती) अनुराधा पौडवाल यांचे आम्ही आभारी आहोत, असे उद्गार  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी काढले. या व्हेंटिलेटरद्वारे उपचार घेणाऱया मुलांपैकी एखादे बाळ भविष्यात एक विख्यात गायक होऊ शकतो, असा सकारात्मक आशावादही त्यांनी व्यक्त केला.    


राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त, विख्यात गायिका पद्मश्री डॉ. (श्रीमती) अनुराधा पौडवाल यांनी आपल्या ‘सर्वोदय फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केईएम रुग्णालयास एनआयसीयू व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात प्रदान केले आहे. या छोटेखानी सोहळ्यात श्री. गगराणी हे बोलत होते.      

 महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी पुढे म्हणाले की,  पद्मश्री डॉ. (श्रीमती) अनुराधा पौडवाल यांच्यावतीने दानस्वरूपात देण्यात आलेला व्हेंटिलेटर अतिशय विनम्रपणे स्वीकारण्याचा मान बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त या नात्याने मला मिळाला आहे. डॉ. पौडवाल यांचे भारतीय संगीत आणि भक्तीमय संगितासाठीचे योगदान अतिशय मौल्यवान आहे. भारतातील अनेक पिढ्यांसमोर डॉ. पौडवाल यांचा आदर्श आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातील समर्पण आणि योगदान हे एका उत्तम शिकवणीसारखेच आहे. समाजासाठी परोपकाराच्या भावनेतून डॉ. पौडवाल यांनी आरोग्य, जल, शिक्षण यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या सर्वोदय फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले आहे, असेही श्री. गगराणी याप्रसंगी म्हणाले.  

याप्रसंगी पद्मश्री डॉ. (श्रीमती) अनुराधा पौडवाल यांचे कुटुंबीय, नाना पालकर स्मृती प्रतिष्ठानचे सदस्य श्री. कृष्णा महाडिक, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या विभागप्रमुख डॉ. (श्रीमती) अनिता हरिबालकृष्णा आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. (श्रीमती) अनिता हरिबालकृष्णा यांनी सांगितले की, नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी एनआयसीयू व्हेंटिलेटरची गरज होती. तर, अवघ्या चार दिवसांमध्ये हे व्हेंटिलेटर बंगळूरू येथून मुंबईत केईएम रूग्णालयात दाखल झाले, अशी प्रतिक्रिया डॉ़. पौडवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच संगीत क्षेत्रातील आपल्या प्रवासातील अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. संगीत हे एखाद्या उपचारामध्ये अतिशय परिणामकारक आहे. कोणत्याही प्रकारचे संगीताचे शिक्षण घेतलेले नसतानाही कठोर परिश्रम करत संगीत क्षेत्रासाठी योगदान देता आले, यासाठीचे समाधान डॉ. पौडवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केले. संगीतामध्ये उपचाराचा गुणधर्म आहे. त्यामुळे संगीताचा आधार घेऊन रूग्ण बरे व्हावेत, असेही मत त्यांनी याप्रसंगी मांडले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com