Top Post Ad

ब्राह्मण व ठाकूर यांनीं "हिंदू हा धर्मचं"नसल्याचें निर्णय देणे आक्षेपार्ह वाटत नाही का?

भारताचे माजी सरन्यायाधीश ( देशस्थ ब्राह्मण ) मा. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर भारताचे सातवे न्यायाधीश असताना म्हणजे 1 फेब्रुवारी 1964 ते 15 मार्च 1966  असतांना::शास्त्रीय यज्ञ पुरुषदजी केस नंबर 1966/SCR (3) 242 या प्रकरणात पाच न्यायमूर्तीच्या पूर्ण पिठाने निर्णय दिलेला आहे. ज्यामध्ये स्वतः भूतपूर्व सर न्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर, न्यायमूर्ती के एन वांच्छू, न्या. एम हिदायतुल्ला, न्या. व्ही. रामास्वामी व न्यायमूर्ती पी. सत्यनारायण राजू यांनी " हिंदू हा धर्म नाही " त्यामुळे हिंदू आणि हिंदुत्व या संकल्पना सुसंगत होत नाहीत. हिंदुत्व हा आयुष्य जगण्याचा एक जिवन मार्ग आहे. असा निकाल 14 जानेवारी 1966 रोजी देण्यात आलेला आहे.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, सोशल वर्कर  यांनी सुप्रीम कोर्टाकडे एक पिटीशन दाखल केले आणि 14 जानेवारी 1966 रोजी दिलेल्या "हिंदू धर्म हा धर्मचं नाही या सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तीच्या पूर्ण पिठावर   सात न्यायमूर्तीच्या  पूर्ण पीठाचीं निर्मिती करून नव्याने " हिंदू धर्माची व्याख्या निश्चित करा" अशी विनंती केली. भारताचे 43 वे माजी सरन्यायाधीश तीरथ सिंग ठाकूर (T.S.Thakur)( कालावधी तीन डिसेंबर 2015 ते 4 जानेवारी 2017 ) यांनी 25 ऑक्टोबर 2016 रोजी  माजी सरन्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर (ब्राम्हण CJI) यांचा" हिंदू हा धर्म नाही, ती एक जीवन पद्धती आहे  " असा दिलेला निर्णय कायम ठेवला. जेव्हा भारताचे दोन माजी सरन्यायाधीश, (एक ब्राह्मण एक ठाकूर ) "हिंदू हा धर्मच नाही" असे म्हणतात तेव्हा, देशात त्यांच्याविरुद्ध किती लोकांनी टीका टिप्पणी केली? अथवा त्यांच्याविरुद्ध टीकेची झोड देशभर का नाही उठवली?

 विद्यमान सरन्यायाधीश  बी.आर.गवई साहेब, जेंव्हा एका राकेश दलाल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर, विष्णू देवताच्या मूर्ती खंडित केल्याच्या संदर्भाने व तिची नव्याने पुनर्रर्स्थापना करणे संदर्भाने  टिप्पणी करतात. ते म्हणाले, "विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हा विषय सुप्रीम कोर्टाचा नसून तो भारतीय पुरातत्त्व संशोधन खात्याचा आहे". तरी तुम्ही जा आणि विष्णूच्या समोर प्रार्थना करा किंवा तसे काहीतरी करा ". त्यांनी दिलेल्या (सल्लावजा निर्णय ) सूचनेच्या अनुषंगाने मात्र त्यांच्यावर कांही जातीयवादी मीडिया आणि मनुवादी, बीजेपी आरएसएसचे लोक अगदी खालच्या स्तराला जाऊन त्यांच्यावर, व त्यांच्या कुटुंबावर "अस्लाध्य" भाषेत शेरे बाजी करणे म्हणजे, हा आदर्श संस्कृतीचा कोणता प्रकार आहे.

" एक  ब्राह्मण सी.जे.आय. व दुसरा ठाकूर नावाच्या CJI यांनी " हिंदू हा धर्मच नाही " असा निकाल दिला तरी देशात त्यांच्या विरुद्ध आंदोलन होत नाही. झाले नाही.किंवा टीका टिप्पणी होत, झाली नाही.   मात्र बौद्ध सीजेआय म्हणतात, "हा प्रश्न(ASI )भारतीय पुरातत्त्व विभागाशी संबंधित असल्यामुळे तुम्ही भगवान विष्णूला प्रार्थना करा नीं तिकडे जा" हे म्हणणे दोन उच्च वर्णीय CJI च्या, " हिंदू हा धर्मच नाही" या निकालापेक्षा आक्षेपार्ह आहे का? "तुम्ही भारतीय पुरातत्व संशोधन विभागाकडे जा" असें म्हणणे आक्षेपार्ह की , " हिंदू हा धर्मचं नाही " असा निकाल देण्याइतके संवेदनशील आहे? याचा उघड उघड अर्थ प्रतिध्वनीत होतो कीं, "एक गुणवत्ताधारक बौद्ध भारताचा सरन्यायाधीश होणे " यांना आवडलेले नाही असाच होत आहे. म्हणजे गुणवत्ता धारक बौद्ध CJI नें दिलेल्या सांविधानीक सल्यापेक्षा उच्चवर्णीयांनीं दिलेले गैरसांविधानिक निर्णय सुद्धा येथील व्यवस्थेला मान्य आहेत का?

  • अनंतराव सरवदे, 
  • "विद्रोह वंचितांचा, पुणे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com